शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोचिंग क्लासेसवर कारवाई

By admin | Updated: February 28, 2016 01:30 IST

विद्यार्थ्यांना मोठ्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळणाऱ्या कोचिंग क्लासेसविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यासह

- प्रमोद गवळी,  नवी दिल्लीविद्यार्थ्यांना मोठ्या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळणाऱ्या कोचिंग क्लासेसविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यासह अन्य सर्व कायद्याखाली कारवाई करणे शक्य आहे; मात्र त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी करणे गरजेचे आहे.राज्यसभेत विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी वरील उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, देशातील कोचिंग क्लासेस अनुभवी शिक्षकांना प्रचंड पगाराचे आमिष दाखवत असल्याबाबतचे अधिकृत आकडे सरकारकडे उपलब्ध नाहीत.सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अनुभवी शिक्षक असावेत, यासाठी न घेतलेल्या रजेचा पगार देणे, ग्रॅच्युइटी, पेन्शन यासह सर्व सुविधा देणे सरकार करीत आहे. शिवाय त्यांना आकर्षक वेतन दिले जाते आणि पदोन्नतीबरोबरच चांगल्या प्रशिक्षण योजनतेही त्यांना सहभागी करून घेतले जाते.पशुपतीनाथ मंदिरासाठी भारताकडून चंदनखासदार विजय दर्डा यांनी उपस्थित केलेल्या अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळच्या दौऱ्यावर गेले असताना, काठमांडूतील प्रख्यात पशुपतीनाथ मंदिरासाठी दोन कोटी रुपये किमतीचे चंदनाचे लाकूड देण्यात आले होते; मात्र हे चंदन जप्त केलेले तसेच सुके होते आणि त्यासाठी चंदनाची झाडे तोडण्यात आली नव्हती. सिंग म्हणाले, पशुपतीनाथ क्षेत्र विकास ट्रस्टला २५00 किलो चंदन भेट म्हणून देण्यात आले. ते पाठवण्याचा खर्च, त्याची पॅकिंग यावर १ कोटी ९१ लाख रुपये खर्च आला. तामिळनाडूतील जंगलातून हे चंदन आणण्यात आले होते. त्यासाठी चंदनाची झाडे तोडली न गेल्यामुळे त्या बदल्यात नवी झाडे लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.चंदनाच्या लाकडांच्या निर्यातीवर बंदी आहे; मात्र वाणिज्य विभागाने तामिळनाडू सरकारची या चंदनाच्या निर्यातीसाठी परवानगी घेतली होती, असेही त्यांनी उत्तरात स्पष्ट केले.