शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहशत माजविणा-या त्रिकुटाकडून चोरीचे प्रकारही

By admin | Updated: May 15, 2015 23:32 IST

पुणे : वडारवाडी परिसरात दहशत माजविणा-या त्रिकुटास चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित एकास लुबाडल्याचे आणि मोटरसायकलवरुन येऊन सोनसाखळी हिसकाविल्याची माहिती पुढे आहे.

पुणे : वडारवाडी परिसरात दहशत माजविणा-या त्रिकुटास चतु:श्रुंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी शस्त्राचा धाक दाखवित एकास लुबाडल्याचे आणि मोटरसायकलवरुन येऊन सोनसाखळी हिसकाविल्याची माहिती पुढे आहे.
काळू उर्फ श्रीकांत सुनिल पवार (आकाशगंगा सोसायटी समोर, वडारवाडी )हर्शद राजेंद्र देशमुख (चव्हाणनगर, पदमावती) आणि सुनिल गौतम कसबे (वडारवाडी )अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या महिनाअखेरीस रात्री नऊच्या सुमारास ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ आठ ते नऊ जणांनी एका टपरीवर शीतपेय पिणा-यांना अचानक मारहाण केली होती. चाकू, लाठ्या, लोखंडी चेन हाती असलेल्या या टोळक्याने वडारवाडीत वाहनांचेही नुकसान केले होते.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण सावंत यांच्या सुचनेनुसार फौजदार राजाराम चौहान, तुषार पाचपुते यांनी या आरोपींचा शोध सुरु केला. हे सर्व आरोपी वडारवाडीत येणार असल्याचे समजल्यावर अकरा तारखेला पहाटे तीनच्या सुमारास हवालदार बाळू गायकवाड, नाईक शरद पाटील, संजय वाघ, संजय शिंदे, शिपाई चेतन गोरे, श्रीनाथ जाधव, विजय मोरे, प्रवीण पाटील यांनी सापळा रचून त्यांना पकडले.
गेल्या ऑगस्ट मध्ये त्यांंनी रात्री पाऊणच्या सुमारास पुलाखाली शक्तिकुमार पाटील (बाणेर)यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साठ हजारांची सोनसाखळी व दहा हजारांची रोकड काढून घेतली होती. तसेच डिसेंबरमध्ये गणेशखिंड रस्त्यावर मोटरसायकलवरुन येऊन एकाची पन्नास ग्रॅम सोनसाखळी हिसकाविली होती.या दोन्ही गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून साठ हजारांची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.
आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून मुख्य सूत्रधार काळू उर्फ श्रीकांत सुनिल पवार हा मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगाराचा भाचा आहे. त्याच्यावर चोरी, हाणामारी असे गुन्हे दाखल आहेत.