शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:51 IST

फरार आरोपी देवप्रकाश मधुकर याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

मैनपुरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमस्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन महिलांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक व सध्या फरार असलेला मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी १ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. आवश्यकता वाटल्यास भोलेबाबाचीही पोलिस चौकशी करणार आहेत.

राम लडाईत (वय ५० वर्षे), उपेंद्र यादव (६२), मेघ सिंग (६१), मुकेश कुमार (३८) तसेच महिलांपैकी मंजू यादव (३०) आणि मंजू देवी (४०) अशी अटक केलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. हाथरस येथे २ जुलै रोजी सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला होता. सत्संगाला ८० हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती; पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले, असे पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी झाला फरार
मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर हाथरसच्या सिकंदराराऊ येथील रहिवासी असून तो भोलेबाबा यांचा निकटवर्तीय आहे. त्याचे घर सध्या बंद असून तो परिवारासहित फरार झाला असल्याचे सांगण्यात आले. मैनपुरी येथील भोलेबाबांच्या आश्रमामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री प्रवेश केला होता. 

दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता
उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले होते. 
चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यांत सरकारला सादर करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सर्व मृतदेहांची ओळख पटली
हाथरस येथील चेंगराचेंगरीमध्ये जीव गमावलेल्या सर्व १२१ लोकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे, असे तेथील जिल्हाधिकारी आशिषकुमार यांनी गुरुवारी सांगितले. हे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

राहुल गांधी आज हाथरसला भेट देणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे शुक्रवारी दौरा करणार आहेत. ही माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी तिरुवअनंतपुरम येथे गुरुवारी दिली. हाथरस येथील सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला होता. ही अतिशय दुर्दैवी घटना होती, असेही ते म्हणाले. हाथरसमधील दुर्घटनेत जखमी झालेले लोक, मृतांचे नातेवाईक यांच्याशी राहुल गांधी संवाद साधतील. 

टॅग्स :Policeपोलिस