शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पोपट ओरडला अन् उलगडला मालकिणीचा खून; ९ वर्षांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 09:47 IST

पाेपटाच्या ओराडण्यावरून शर्मा यांनी पोलिसांना भाच्याची चौकशी करण्याची विनंती केली.

आग्रा : आग्र्यातील अग्रगण्य वृत्तपत्राचे मुख्य संपादक विजय शर्मा यांच्या पत्नी नीलम शर्मा यांची २० फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांच्याच घरात दरोड्यानंतर हत्या झाली होती. मात्र, घरातला पाळीव पोपट, शर्मा यांच्याच भाच्याचे नाव घेऊन ओरडेपर्यंत पोलिसांकडे कोणताच सुगावा नव्हता. पोपटच्या सतत ओरडण्यामुळे विजय शर्मा यांना संशय आला आणि त्यातून खुनाचा उलगडा झाला. न्यायालयाने ९ वर्षांनंतर आराेपींना जन्मठेप सुनावली. 

पाेपटाच्या ओराडण्यावरून शर्मा यांनी पोलिसांना भाच्याची चौकशी करण्याची विनंती केली. त्यानंतर आशूने त्याचा मित्र रॉनीच्या मदतीने नीलमची हत्या केल्याची कबुली दिली. शुक्रवारी हत्येच्या ९ वर्षांनी विशेष न्यायाधीश मोहम्मद रशीद यांनी आशू आणि रॉनी या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. माहितीनुसार, विजय शर्मा, मुलगा राजेश आणि मुलगी निवेदिता यांच्यासोबत फिरोजाबाद येथे एका लग्नासाठी गेले होते. नीलम घरीच होत्या. रात्री घरी परतल्यावर पत्नी आणि पाळीव कुत्रा निपचीत पडल्याचे बघून त्यांना धक्का बसला. दोघांची चाकूने वार करून हत्या झाली होती.

घटनेच्या ६ महिन्यांनी पोपटाचा मृत्यू झाला. तर, कोरोना महामारीदरम्यान १४ नोव्हेंबर २०२० रोजी विजय शर्मा यांचे निधन झाले. आशू नेहमी घरी यायचा, घरातील दागिने-रोख रकमेबाबत त्याला माहिती होती, त्यानेच दरोड्याची योजना आखली, असे शर्मांची मुलगी निवेदिता म्हणाली. “माझ्या पालकांची इच्छा होती की, आशूला फाशी व्हावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करू” असे ती म्हणाली.

पोपट ओरडायला लागला “आशू-आशू” 

पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही संशयितांना पकडण्यात आले. दुसरीकडे, शर्मा यांच्या पोपटाने खाणेपिणे बंद केले आणि तो अगदी गप्प झाला. हा खून पोपटानेच पाहिला असावा, असा संशय शर्मा यांना आला. त्यांनी पोपटासमोर संशयितांची नावे घेण्यास सुरुवात केली, तेव्हा आशूचे नाव घेताच पोपट घाबरला आणि “आशू-आशू” ओरडू लागला. पोलिसांसमोरही आशूच्या नावावर पोपटाची अशीच प्रतिक्रिया आल्यावर त्याला अटक करण्यात आली. पोपट पोलिसांच्या तपासाचा भाग होता. तथापि, तो पुराव्याचा भाग नव्हता. संपूर्ण खटल्यात पोपटाचा उल्लेख करण्यात आला होता; परंतु कायद्यात तरतूद नसल्याने पुरावा म्हणून त्याला सादर करण्यात आले नाही. 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस