शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:24 IST

इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे.

अमेरिकेने इंजिन पुरवठा न केल्याने तेजस फायटर जेटच्या निर्मितीचे काम रखडले होते. यामुळे हवाई दलाला वेगाने आपली विमाने बदलण्यास अडथळा आला होता. यावर गेल्याच महिन्यात हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)वर आपला विश्वास नसल्याचे वक्तव्य केले होते. आता ही चिंता दूर होणार आहे. अमेरिकेहून तेजससाठीचे पहिले इंजिन आले आहे. 

इंजिन आल्याने आता तेजस लढाऊ विमानाचा सांगाडा बनविण्याचे, तसेच इतर यंत्रणा जोडण्याचे काम वेगाने सुरु होणार आहे. इंजिन नसल्याने हलच्या अभियंत्यांना याचा अंदाज येत नव्हता. यामुळे सर्वच कामे खोळंबली होती. अमेरिकेची जीई एअरोस्पेस कंपनीने पहिले लढाऊ इंजिन पाठविल्याचे जाहीर केले आहे. 

तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टला आम्ही F404-IN20 या ९९ इंजिनांच्या ऑर्डरपैकी पहिले इंजिन पाठविले आहे. भारतासोबत आमचे ४० वर्षांचे संबंध आहेत, त्यांच्या संरक्षण क्षेत्राची क्षमता वाढविण्यासाठी आणि पुढील पिढीच्या लढऊ विमानांना मजबूत ताकद देण्यासाठी आम्ही एक मैलाचा दगड पार केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. 

पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. हल हवाई दलाला तेजस लढाऊ विमानांची पुढची पिढी देणार आहे. परंतू, अमेरिकेने या लढाऊ विमानांच्या इंजिनाला विलंब केला आहे. तसेच हलमध्ये अंतर्गत समस्या आहेत. यामुळे या फेब्रुवारीत हवाई दलाला मिळणारी ११ लढाऊ विमाने मिळू शकलेली नव्हती. यामुळे हवाई दल प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली होती. 

तेजसला २००४ पासून याच कंपनीची इंजिन आहेत. या इंजिनाच्या साह्याने तेसजने १.१ मॅकचा स्पीड गाठला होता. हे सिंगल इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. 

कंपनीने सांगितले का उशीर झाला...जीई कंपनीने भारतासाठी २०१६ पर्यंत ६५ इंजिन बनविली होती. परंतू. भारताने पुढे ऑर्डर न दिल्याने त्याची प्रॉडक्शन लाईन बंद करण्यात आली होती. हलने पुन्हा २०२१ मध्ये ९९ इंजिनची ऑर्डर दिली. परंतू, लाईन गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने ती पुन्हा सुरु करण्यात अडचणी होत्या. बंद असलेली मशीनरी पुन्हा सुरु करण्याच्या आव्हानांना पार केले गेले. यानंतर ग्लोबल सप्लाय चेनही बंद पडली होती. ती देखील सुरु करण्यात आली, असे कारण कंपनीने विलंबासाठी दिले आहे. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAmericaअमेरिका