तिरुवनंतपुरम :केरळचा मुख्यमंत्री कोण असावा, हे सोशल मीडियावर सुरू असलेली मोहीम किंवा समर्थकांनी लावलेले फ्लेक्सबोर्ड ठरवणार नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी स्पष्ट केले.
राज्याचा मुख्यमंत्री निवडण्याचा अंतिम निर्णय हा काँग्रेसच्या हाय कमांडचा असेल. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान यूडीएफचे नेतृत्व व्ही. डी. सतीशन यांनी केले होते. त्यामुळे सतीशन यांनाच मुख्यमंत्री करावे, ही मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना चेन्नीथला यांनी संबंधित वक्तव्य केले आहे.
परदेशी कोट्यातून डल्ला! रेल्वेचा १२१ प्रवाशांना मोठा दंड; पाहा कसा होत होता तिकिटांचा गैरवापर
विधानसभेच्या स्थापनेसाठी बंगालमध्ये अधिसूचना
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, नवीन विधानसभेच्या स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने एक अधिसूचना जारी केली आहे.
ही अधिसूचना पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडे पाठविण्यात आली असून, याद्वारे निवडणूक प्रक्रियेची औपचारिक समाप्ती झाली आहे आणि नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
टीव्हीकेला पाठिंबा, काँग्रेसचे द्रमुकशी संबंध संपुष्टात
द्रमुकची दीर्घकाळापासूनची सहयोगी असलेल्या काँग्रेसने, बुधवारी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा जाहीर केला आणि त्यासोबतच द्रविड राजकारणातील द्रमुक या प्रमुख पक्षाशी असलेले संबंध संपुष्टात आणले.
आययूएमएलचा पाठिंबा देण्यास नकार
चेन्नई : राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, द्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या व्हीसीकेने पाठिंबा द्यायचा की नाही, यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे पक्षाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. टीव्हीकेने निमंत्रण देऊनही, डाव्या पक्षांनी आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगने (आययूएमएल) त्या पक्षाला पाठिंबा देण्यास स्पष्टपणे नकार दिला. व्हीसीकेने दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Web Summary : Kerala's next CM will be decided by Congress High Command, not social media campaigns. Congress supports TVK in Tamil Nadu, ending alliance with DMK. West Bengal's new assembly formation notified. IUML refuses to back TVK.
Web Summary : केरल का मुख्यमंत्री कांग्रेस आलाकमान तय करेगा, सोशल मीडिया मुहिम नहीं। कांग्रेस ने तमिलनाडु में टीवीके का समर्थन किया, डीएमके से गठबंधन तोड़ा। पश्चिम बंगाल विधानसभा गठन अधिसूचित। आईयूएमएल ने टीवीके का समर्थन करने से इनकार किया।