शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:46 IST

"आत्मनिर्भर भारतच देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा आधार बनेल..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (20 सप्टेंबर) गुजरातमधील भावनगर येथे आयोजित 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमावेळी देशभरातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांसाठी एकूण 34,200 कोटी रुपयांपेक्षाही अधिक  खर्च येणार येणे अपेक्षित आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "भारताचा सर्वात मोठा शत्रू कुठलाही देश नाही, तर परदेशांवरील आपले 'परावलंबन' आहे. हे संपवून 'आत्मनिर्भर भारता'चा संकल्प पूर्ण करायचा आहे."

गुजरातसाठी 26,354 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन -यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 26354 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यांत, छारा बंदरावर एचपीएलएनजी री-गॅसिफिकेशन टर्मिनल, गुजरात आयओसीएल रिफायनरीमध्ये ॲक्रिलिक्स अँड ऑक्सो अल्कोहोल प्रकल्प, 600 मेगावॉटचे ग्रीन शू इनिशिएटिव्ह, पीएम-कुसुम योजनेअंतर्गत 475 मेगावॉट सोलर फीडर, 45 मेगावॉटचा बादेली सोलर प्रकल्प, कच्छमधील धोर्डो हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणे, भावनगर आणि जामनगर येथील सरकारी रुग्णालयांचा विस्तार, 70 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चार-पदरीकरण आदी कामांचा समावेश आहे.

काय म्हणाले मोदी? -भावनगर येथील विशाल जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारत विश्वबंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे. आपल्यासाठी कोणीही मोठा शत्रू नाही, पण जर कोणी सर्वात मोठा शत्रू असेलच तर तो म्हणजे, आपले दुसऱ्यांवर असलेले अवलंबित्व. हा भारताचा सर्वात मोठा कमकुवतपणा असून आपल्याला त्याला पराभूत करायचे आहे. 140 कोटी देशवासियांचे भविष्य आत्मनिर्भर भारतातच सुरक्षित आहे. जर आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो, तर आपला स्वाभिमान आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य दोन्ही धोक्यात येईल." एवढेच नाही तर, आत्मनिर्भर भारतच देशाच्या शक्ती, सन्मान आणि स्थैर्याचा आधार बनेल, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGujaratगुजरातAmericaअमेरिका