शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात, एक्स्प्रेसवेवर ट्रकने कारला ४ किमीपर्यंत फरफटत नेले, ४ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 10:30 IST

Accident News: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एक कार आणि अज्ञान वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कारमधून पाच जण महाकालाचं दर्शन घेऊन उज्जैन येथून नोएडा येथे परतत होते. त्यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील चेनेज क्रमांक १९४ जवळ हा अपघात झाला. 

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर एक कार आणि अज्ञान वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कारमधून पाच जण महाकालाचं दर्शन घेऊन उज्जैन येथून नोएडा येथे परतत होते. त्यावेळी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील चेनेज क्रमांक १९४ जवळ हा अपघात झाला. 

या अपघाताबाबत पोलिसांनी सांगितले की, अपघातग्रस्त कार ही हरियाणामधील  असल्याचे तिच्या क्रमांकावरून दिसत असून, कारमधून पाच जण प्रवास करत होते. हे सर्वजण उज्जैन येथील महाकालचे दर्शन करून नोएडा येथे परतत होते. याचदरम्यान, ही भरधाव कार एका अज्ञात वाहनाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात या कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने या कारला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, अशी धक्कादायक माहिती या अपघातात जिवंत वाचलेल्या तरुणाने दिली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पापडदा आणि नांगल राजावतान पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातात बचावलेल्या जखमी तरुणाला त्वरित जवळच्या रुग्णालयात पोहोचवले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र ते हरियाणामधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच पोलिसांनी अपघातग्रस्त कारमधील चारही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Accident After Temple Visit: Truck Drags Car; Four Dead

Web Summary : Four people died on the Delhi-Mumbai Expressway when a truck collided with their car, dragging it for kilometers. The victims were returning from a temple visit in Ujjain. One person survived and is critically injured. Police are investigating the accident.
टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश