शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या स्मारकासाठी पानिपतला दहा एकर जागा, पुढील वर्षापासून शौर्य दिनाचे आयोजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 06:19 IST

शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने पानिपत येथे २६४ व्या शौर्य दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

- चंद्रशेखर बर्वेपानिपत : पानिपतच्या युद्धात वीरगतीला प्राप्त मराठा योद्ध्यांच्या स्मारकासाठी लागणारी १० एकर जमीन आता महाराष्ट्र सरकारकडून अधिग्रहित केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे केली.

शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने पानिपत येथे २६४ व्या शौर्य दिवस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुष मंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, हरयाणाचे कृषिमंत्री श्याम सिंह राणा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ट्रस्टचे प्रदीप पाटील उपस्थित होते. फडणवीस यांनी सुरुवातीला ‘काला आम’ या ठिकाणच्या शौर्य स्थळाला भेट देऊन श्रद्धा सुमने अर्पित केली.

मुख्यमंत्री म्हणाले, पानिपतच्या पवित्र भूमीवर मराठ्यांच्या स्मारकासाठी लागणारी १० एकर जागा आता महाराष्ट्र सरकारकडून अधिग्रहित केली जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा उभारला जाईल. 

काला आम म्हणजे काय..?पानिपतच्या युद्धात सव्वा लाख मराठे हुतात्मे झाले. त्यांच्या रक्ताने येथील आंब्याचे झाड लाल झाले. सुकल्यामुळे रक्त काळे झाले. या झाडाला आंबेसुद्धा काळे येत होते. म्हणून या झाडाला ‘काला आम’ म्हटले जाते. याच झाडाच्या ठिकाणी ‘शौर्य स्मारक’ बांधण्यात आले.

उत्तर भारतातील राज्यकर्ते मराठ्यांशी एक झाले असते तर अहमद शाह अब्दाली आणि अन्य शत्रूची भारताकडे बघण्याचीसुद्धा हिंमत झाली नसती. म्हणून आपल्याला ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ ही गोष्ट कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHaryanaहरयाणा