शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 06:44 IST

Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ६७ ते ७६ जागा मिळतील असा अंदाज 'ॲक्सिस माय इंडिया' या एक्झिट पोल एजन्सीने वर्तवला आहे. परंतु, १२१ ते १४१ जागा मिळवत एनडीएचीच सत्ता येईल, असा अंदाजही या संस्थेने वर्तविला आहे.  

नवी दिल्ली - बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ६७ ते ७६ जागा मिळतील असा अंदाज 'ॲक्सिस माय इंडिया' या एक्झिट पोल एजन्सीने वर्तवला आहे. परंतु, १२१ ते १४१ जागा मिळवत एनडीएचीच सत्ता येईल, असा अंदाजही या संस्थेने वर्तविला आहे.  भाजपला ५० ते ५६, जदयूला ६२ ते ६५, काँग्रेसला १७ ते २१, व्हीआयपीला ३ ते ५, डाव्या पक्षांना १० ते १४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

टुडेज चाणक्यने एनडीएला बहुमत'टुडेज चाणक्य' या एक्झिट पोलने भाजपप्रणित एनडीए आघाडीला घवघवीत यश मिळेल असा दावा केला आहे.  जनसुराज्यची सुरुवात अत्यंत वाईट आहे. मतांची टक्केवारी पाहता एनडीएला ४४ तर महाआघाडीला ३८ टक्के मते मिळतील. अन्य पक्षांना १८ टक्के मिळतील असा दावा आहे.

राज्यात सत्ता कोणाची? महिला ठरवणार! - राज्यातील विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या एकूण ६६.९१ टक्के मतदानात पुरुषांचा वाटा ६२.८ टक्के, तर महिलांचा वाटा हा ७१.६ टक्के आहे. पुरुषांपेक्षा मतदान करणाऱ्या महिलांची संख्या ८.८ टक्के जास्त असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण ६५.०८ टक्के मतदान झाले. यात महिला मतदारांची संख्या ६९.०४, तर पुरुष मतदारांची संख्या ६१.५६ टक्के होती. दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढून ते ६८.७६ झाले.- यात ७४.०३ टक्के महिलांनी, तर ६१.०१ टक्के पुरुषांनी मतदान केले. दोन्ही टप्प्यांतील एकून मतदानाची आकडेवारी पाहिल्यास महिलांनी केलेले मतदान ७१.६, तर पुरुषांचे मतदान ६२.८ टक्के झाले आहे. राज्यात एकूण मतदान ७ कोटी ४५ लाख २६ हजार ८५८ आहे.

भाजपकडून ५०१ किलो लाडवांची ऑर्डरबिहार विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री असल्याने निकालापूर्वीच भाजपने ५०१ किलो लाडूंची ऑर्डर दिली आहे. निवडणुकीच्या निकालादिवसी या लाडूंचे वाटप केले जाणार आहे.बिहारमध्ये शुक्रवारी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलने एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. आम्हाला विजयाची खात्री असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते कृष्णकुमार कल्लू यांनी केला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Exit Polls Predict NDA Victory in Bihar Despite Tejashwi's Lead

Web Summary : Exit polls predict NDA will win Bihar, securing 121-141 seats, despite Tejashwi Yadav's RJD leading with 67-76. Women voters outnumbered men. BJP ordered 501 kg of sweets for celebration.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेड