मनपा शाळांची गणवेश खरेदी नियमाप्रमाणे शिक्षकांचे म्हणणे: आयुक्तांनी बोलावली बैठक

By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:56+5:302015-08-07T00:06:56+5:30

सोलापूर : मनपा शाळांतील मुलांसाठी गणवेश खरेदी नियमाप्रमाणेच झाली आहे, असे निवेदन राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना गुरूवारी दिले.

Teachers say uniforms of NMC schools: The meeting convened by the Commissioner | मनपा शाळांची गणवेश खरेदी नियमाप्रमाणे शिक्षकांचे म्हणणे: आयुक्तांनी बोलावली बैठक

मनपा शाळांची गणवेश खरेदी नियमाप्रमाणे शिक्षकांचे म्हणणे: आयुक्तांनी बोलावली बैठक

लापूर : मनपा शाळांतील मुलांसाठी गणवेश खरेदी नियमाप्रमाणेच झाली आहे, असे निवेदन राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांना गुरूवारी दिले.
मनपा शाळांमधील मुलांसाठी नियमबाह्य गणवेश खरेदी झाल्याचा आरोप शिक्षण मंडळाचे सदस्य थोरात यांनी केला आहे. यावर संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, सचिव अमोल भोसले, मो. अझरोद्दीन पंजेवाले यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त काळम—पाटील यांची भेट घेतली. अशा आरोपांमुळे महापालिका शाळांची विनाकारण बदनामी झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार गणवेश खरेदी व नामवंत कंपनीचे कापड खरेदी केले आहे. विद्यार्थी संख्येत तफावत नाही. गतवर्षी जादा आलेली रक्कम धनादेशाद्वारे परत केली आहे तर यंदा मागणीपेक्षा अनुदान कमी आले आहे. त्यामुळे आणखी ७00 विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगण्यात आले.
त्यावर आयुक्त काळम—पाटील यांनी प्रशासन अधिकारी कांबळे यांनी याबाबत तत्काळ खुलासा करणे अपेक्षित होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी खातेप्रमुखांची ८ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देण्यासाठी महापालिका शाळांमधील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

Web Title: Teachers say uniforms of NMC schools: The meeting convened by the Commissioner