शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पती-पत्नीने घेतला २ कोटी २० फुकट पगार, आता सरकारला द्यावे लागणार ९.२० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:10 IST

शिक्षकाची नोकरी करणाऱ्या पती-पत्नीने १९९८-९९ पासून शाळेत शिकवायला न जाताच इतकी वर्षे पगार घेतला. त्यांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण विभागही हादरला.  

पती १९९८ मध्ये तर पत्नी १९९ मध्ये शिक्षण म्हणून सेवेत रूजू झाली. तेव्हापासून दोघेही शाळेत वर्ग घेण्यासाठी गेलेच नाहीत. त्यांनी या काळात तब्बल २ कोटी २० लाख इतके वेतनही घेतले. पण, दोघेही विद्यार्थ्यांना न शिकवत फक्त पगारच घेत असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभाग हादरून गेला. या प्रकरणात दोषी ठरलेल्या शिक्षक पती-पत्नीकडून ९ कोटी २० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आता काढण्यात आले आहेत. 

ही घटना राजस्थानच्या शिक्षण विभागात घडली आहे. शिक्षक पती-पत्नी विद्यार्थ्यांना शिकवायला जातच नव्हते, पण बोगस स्वाक्षऱ्या करून पगार घेत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी एका पुरुषाला आणि महिलेला विद्यार्थ्यांचे क्लास घेण्यासाठी ठेवले होते, त्यासाठी ते त्यांना काही पैसेही देत होते. 

तक्रारीनंतर सुरू झाली होती चौकशी

विष्ण गर्ग आणि त्यांची पत्नी मंजू गर्ग यांचीराजस्थानातील बारां जिल्ह्यातील राजपूर येथे असलेल्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. पण, मागील अनेक वर्षांपासून दोघेही शाळेतच जात नव्हते. शिक्षण विभागाने या प्रकरणी २१ डिसेंबर २०२३ मध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर याची चौकशी सुरू झाली होती. 

आतापर्यंत उचलला २.२० कोटी पगार

चौकशीतून समोर आले की, विष्ण गर्ग यांची नियुक्ती १९९७-९८ मध्ये झाली होती. तर मंजू गर्ग यांची नियुक्ती १९९ मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत दोघांनी तब्बल २ कोटी २० लाख रुपये इतका पगार घेतला. त्याचबरोबर दोघेही माध्यान्ह भोजन आहार आणि शाळेसाठी असलेल्या इतर निधीतही घोटाळा करून पैसे उकळत होते. 

व्याजासह वसुली 

शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी आढळून आलेल्या शिक्षक पती-पत्नीकडून व्याजासह वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाने दोघांकडून ९ कोटी २० लाख रुपये वसूल करण्याचे आदेश काढले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajasthan Teachers Took Salary Without Teaching, Must Repay Millions

Web Summary : Rajasthan teacher couple drew salaries for years without teaching. An investigation revealed they hired substitutes. Now, they must repay ₹9.2 crore, including interest, after fraudulently collecting ₹2.2 crore in wages and misappropriating funds.
टॅग्स :fraudधोकेबाजीTeacherशिक्षकSalaryपगारEducationशिक्षणPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार