शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पटसंख्येच्या वजाबाकीने शिक्षक चिंतेत

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

जिल्हा परिषद : विद्यार्थीसंख्येची जुळवाजुळव नागपूर : पालकांचा कल विचारात घेता ग्रामीण व शहरालगतच्या भागात इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. याचा फटका बसल्याने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळातील पटसंख्या १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. पटसंख्येच्या वजाबाकीमुळे शिक्षकांची चिंता वाढली ...


जिल्हा परिषद : विद्यार्थीसंख्येची जुळवाजुळव
नागपूर : पालकांचा कल विचारात घेता ग्रामीण व शहरालगतच्या भागात इंग्रजी वा सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. याचा फटका बसल्याने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषदेच्या शाळातील पटसंख्या १५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. पटसंख्येच्या वजाबाकीमुळे शिक्षकांची चिंता वाढली आहे.
प्राथमिक शाळातील इयत्ता चौथ्या वर्गातून उत्तीर्ण होऊ न विद्यार्थी पाचवीत जातात. परंतु पहिल्या वर्गात त्या तुलनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाही. त्यामुळे अशा प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांर्ंची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे.
नागपूरसह जिल्ह्यात शहरालगतच्या जमिनीच्या किमती मागील काही वर्षात प्रचंड वाढल्या आहेत. शहराजवळ एक -दोन एकर शेती असणारा अल्पभूधारक आता करोडपती झाला आहे. जमिनीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात पैसा आला. याचा परिणाम त्यांच्या जीवनमानावरही पडला आहे. यातूनच आपल्या पाल्यांना इंग्रजी वा सेमी इंग्रजी शाळेतून शिक्षण देण्याऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशीच अवस्था खासगी अनुदानित वा विना अनुदानित शाळांची आहे. शाळेत विद्यार्थी असेल तोवरच नोकरी असल्याने अशा शाळातील शिक्षकांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)
बॉक्स....
प्रस्ताव कागदावरच
मराठी माध्यमाच्या शाळातील विद्यार्थ्याची पटसंख्या दरवर्षी क मी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पालक ांचा कल लक्षात घेता जि.प.च्या शिक्षण समितीचा सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव व शासन मंजुरीची प्रतीक्षा यामुळे हा प्रस्ताव कागदावर आहे.
बॉक्स...
शिक्षकांची भटकंती
दरवर्षी पटसंख्या कमी होत असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. समायोजनात सर्वाना समावून घेतले जाईलच याची शाश्वती नसल्याने अतिरिक्त शिक्षकांची चिंता वाढली आहे. पटसंख्या कायम राहिली तर इतर भानगडी टळतील म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या शोधात भटकंती सुरू झाली आहे.