शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

एका ट्वीटमुळे टीसीने गमावली नोकरी

By admin | Updated: September 13, 2016 20:31 IST

रेल्वेप्रवाशाने केलेल्या एका ट्वीटमुळे एका भ्रष्ट टीसीला नोकरी गमवावी लागली आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनी केलेल्या ट्वीटमुळे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.13- रेल्वेप्रवाशाने केलेल्या एका ट्वीटमुळे एका भ्रष्ट टीसीला नोकरी गमवावी लागली आहे. बाडमेर-कालका एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनी केलेल्या ट्वीटमुळे ट्रॅव्हेलिंग टिकीट इन्स्पेक्टर श्यामलाल यांना नोकरी गमवावी लागली आहे. 

कालका एक्सप्रेसमध्ये श्यामलाल हा टीसी 15 रुपये घेऊन प्रवाशआंना सीट देत होता. मात्र, त्यानंतर कोणती पावती तो प्रवाशआंना देत नव्हता. याच गाडीने प्रवास करणा-या गोविंद नारायण यांनीही 15 रूपये श्यामलाल यांना दिले व त्याबदल्यात पावतीची मागणी केली. त्यावर श्यामलाल यांनी पावतीबाबत गोविंदला उडवाउडवीची उत्तरं दिली.  श्यामलालची बनवाबनवी लक्षात येताच गोविंद यांनी  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह रेल्वेच्या इतर अधिकाऱ्यांना ट्वीट करून यासंबंधी तक्रार केली.
 
तक्रार केल्याच्या दोन तासांतच रेल्वेच्या अधिका-यांनी गोविंद यांच्याशी संपर्क साधला व संबंधीत डब्यामध्ये पोहोचले. त्यानंतर गोविंद नारायण यांच्यासह इतर प्रवाशांकडे त्यांनी चौकशी केली. सर्व प्रकार समजवून घेतल्यानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना  याबाबत माहिती देण्यात आली व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्यामलाल यांचं तातडीने निलंबन करण्यात आलं. शिवाय पुढील स्थानकावर त्यांना रेल्वेतून खाली उतरविण्यात आलं.