टाकळी भीमा सरपंचपदी दोरगे

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:16+5:302015-08-27T23:45:16+5:30

तळेगाव ढमढेरे : टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रवींद्र दोरगे, तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

Tarkali Bhima will be the Sarpanch | टाकळी भीमा सरपंचपदी दोरगे

टाकळी भीमा सरपंचपदी दोरगे

ेगाव ढमढेरे : टाकळी भीमा (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रवींद्र दोरगे, तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.
टाकळी भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायतीची निवडणूक माजी पंचायत समिती सदस्य सुनील वडघुले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बिनविरोध केली. विशेषत: सलग ३ वर्षे ही ग्रामपंचायत बिनविरोध होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. या वेळी सरपंचपदासाठी रवींद्र बाळासाहेब दोरगे व उपसरपंचपदासाठी पांडुरंग बबन ढोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी रवींद्र दोरगे व उपसरपंचपदी पांडुरंग ढोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आयूब सय्यद व ग्रामसेविका मनीषा शेळके यांनी सांगितले.
या वेळी उमेश काळे, सिंधू अवचिते, कविता पाचर्णे, कमल वडघुले, सुभाष वडघुले, सुमन वडघुले, कविता माहुलकर हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

*******

Web Title: Tarkali Bhima will be the Sarpanch