शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तापस पाल यांच्या पत्नीने मागितली माफी

By admin | Updated: July 1, 2014 12:42 IST

महिलांविषयी प्रक्षोभक विधान करणा-या तापस पाल यांच्यावतीने त्यांची पत्नी नंदिनी पाल यांनी माफी मागितली आहे.

 

ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. १ -  मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा असे प्रक्षोभक विधान करणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार तापस पाल यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरु झाल्यावर तापस यांची पत्नी नंदिनी पाल यांनी तापस यांच्या विधानासाठी माफी मागितली आहे. या संपूर्ण घटनाक्रमाची दुसरीबाजूही आहे असे नंदिनी पाल यांनी म्हटले असले ही बाजू कोणती याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. 
तृणमूल काँग्रेसचे खासदार व अभिनेते तापस पाल यांनी पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना अत्यंत संतापजनक विधान केले होते.  सत्ताधारी पक्षाच्या एकाही कार्यकत्र्यावर हल्ला झाल्यास माकपच्या कार्यकत्र्याना ठार मारले जाईल. या पक्षाच्या महिलांवर बलात्कार केले जातील, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला होता. हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर तापस पाल यांच्यावर टीकेची झोड उठली. यापार्श्वभूमीवर मंगळवारी नंदिनी पाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'मी तापस यांच्या विधानासाठी सर्वांची माफी मागते. या विधानाचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण या घटनाक्रमाला आणकी एक पैलू असून तापस यांना असे बोलण्यासाठी उकसवले गेले' असा दावाही नंदिनी यांनी केला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनेही तापस सेन यांना कारणेदाखवा नोटीस बजावत ४८ तासांत स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे. तर काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट पक्षाच्या महिला नेत्यांनी तापस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.