'हे तर टोपी नसलेले तबलिगी'; जगन्नाथ रथयात्रेवरून मोदींच्या खास मित्राचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 14:00 IST2020-06-24T13:58:24+5:302020-06-24T14:00:41+5:30
भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. यामुळे कोरोनाचा उद्रेक देशभर झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.

'हे तर टोपी नसलेले तबलिगी'; जगन्नाथ रथयात्रेवरून मोदींच्या खास मित्राचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली : जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त मंजुरी दिल्याने रथयात्रा काढण्यात आली होती. यावेळी तिथे भाविकही हजर राहिले होते. मात्र, यावर मोलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू जफर सरेशवाला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी रथयात्रेमध्ये सहभागी झालेल्यांना 'टोपी नसलेले तबलिगी' म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
भारतात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरु झाला होता तेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये तबलिगी जमातीच्या लोकांनी दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला होता. यामुळे कोरोनाचा उद्रेक देशभर झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनीही तेव्हा हा कार्यक्रम घेतला गेला ही चूक झाली, असे कबुल केले होते. यावेळी देशभरात तबलिगींविरोधात तणावाचे वातावरण होते.
जफर सरेशवाला हे अहमदाबादचे व्य़ापारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मानले जातात. त्यांनी एएनआयचा व्हिडिओ शेअर करत त्यावर 'टोपी नसलेले तबलिगी' म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिर समिती आणि सरकारच्या सहकार्याने जगन्नाथ यात्री काढली जाऊ शकते असे म्हटले होते. तसेच लोकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये असे आदेश दिले होते. मात्र, मंगळवारी निघालेल्या रथयात्रेमध्ये भाविकांनी तुडुंब गर्दी केली होती.
These are #Tablighi ‘s without Topi https://t.co/WNt2lMOx2E
— zafar sareshwala (@zafarsareshwala) June 23, 2020
यावर ओडिसाचे कायदा मंत्री प्रताप जेना यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील सर्व पुजाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये एकजण पॉझिटिव्ह सापडला आहे. त्याला रथ यात्रेमध्ये सहभागी होता येणार नाही. ही रथयात्रा 1 जुलैला संपणार आहे.
सरशेवाला मोदींच्या जवळचे
सरशेवाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांनी 2014मध्ये मोदींसाठी झोकून देऊन प्रचार केला होता. मोदींसाठी प्रचार करणारा मुस्लिम चेहरा म्हणून ते चर्चेत आले होते. यावेळी त्यांन मोदींवरील एका उर्दू वेबसाईटच्या लाँचिगवेळीही प्रमुखाची भुमिका निभावली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या....
"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त
4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला
India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार
न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम
India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला
चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अॅप
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला