"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:19 PM2020-06-24T12:19:44+5:302020-06-24T12:23:38+5:30

भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे.

we feed nepal in trouble, now they want to make trouble us; Citizens of Bihar angry | "नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

"नेपाळला संकटात खायला घातले, आता आम्हालाच डसला"; बिहारचे नागरिक संतप्त

googlenewsNext

पाटणा : नेपाळच्या अडेतट्टूपणामुळे बिहारचा मोठा भाग महापुराच्या संकटात अडकणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीय़श कुमार यांनी पुरापासून सुरक्षेसाठी लांबलेल्या योजनांना पूर्ण करण्य़ासाठी नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. 


भारत नेपाळच्या सीमेवर पुराचे पाणी रोखण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम नेपाळने थांबविले आहे. ललबकेया नदीवरील बंधाऱ्याला नेपाळ सरकारने बंदी आणली आहे. पूर्वी चम्पारण जिल्हा मुख्यालयापासून 60 किमीवर याच नदीवर एका बांध आहे. तो इंग्रजांनी पूर रोखण्यासाठी बांधला होता. मात्र, 2017 मध्ये आलेल्या महापुरामुळे दोन्ही देशांदरम्यान वाद सुरु झाला आहे. हा बंधारा वेळोवेळी पुनर्निर्माण केला जात होता. मात्र नेपाळने हे काम रोखल्याने आता पुराचा धोका वाढला आहे. 


धक्कादाय़क म्हणजे नेपाळमध्ये कोणतेही संकट आले की नेपाळी नागरिक भारतात शरण घेतात. नेपाळने बंधाऱ्याचे काम रोखल्याने गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. 2017 मध्ये आलेल्या पुरावेळी नेपाळी नागरिकांना आम्ही आमच्या वाट्याचे जेवण दिले होते. त्यांना वाचविले होते. याच बजरहा गावातील लोक आता नेपाळी पोलिसांसोबत मिळून भारतीय नागरिकांना मारहाण करत आहेत, असे बिहारच्या सीमेवरील एका नागरिकाने सांगितले. 


हीरापूर गावाचे अब्दुल बारी यांनी सांगितले की, या बजरहा गावचे लोक बंधारा बांधण्यासाठी नेहमी तेथील अधिकाऱ्यांशी वाद घालतात. मात्र, यंदा त्यांनीच आपली जागा असल्याचा दावा करून काम थांबविले आहे. जर या बंधाऱ्यामुळे पाणी अडले तर नेपाळमध्ये पूर येईल अशी भीती तेथील प्रशासनाला वाटत आहे. नेपाळच्या बदललेल्या भुमिकेमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण असल्याचे महताब आलम यांनी सांगितले. नेपाळच्या लोकांचा एवढा बदललेला स्वभाव आजपर्यंत पाहिला नाही. त्यांच्याशी रोटी-बेटीचे नाते होते, असे बलुआ गुआबारीचे प्रमुख अतिकुर्र रहमान यांनी सांगितले. 


इंग्रजांनी बांधलेला 4.11 किमीची बंधारा
हिमालयाच्या कुशीतून येणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी आणि दुसरीकडे वळविण्यासाठी इंग्रजांनी हा 4.11 किमीची बंधारा बांधला होता. या बंधाऱ्याची वेळोवेळी दुरुस्ती आणि पूनर्निर्माण केले जात होते. दरवर्षी याला नेपाळी नागरिक आणि प्रशासन विरोध करत होते. मात्र, चर्चेनंतर हा वाद मिटविला जात होता. 

अन्य महत्वाच्या बातम्या....

4000 कोटींचा पाँझी घोटाळा दडपला; IAS विजय शंकर यांचा घरातच मृतदेह सापडला

India China FaceOff: पुन्हा डोकलाम? लडाखमध्ये फेल झालेल्या चीनचा नवा डाव; भूतानला जाळ्यात ओढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

India China Face Off: भारताला धडा शिकवायला गेला अन् चीनचा जनरल झाओ दुसऱ्यांदा तोंडघशी पडला

चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अ‍ॅप

अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

Web Title: we feed nepal in trouble, now they want to make trouble us; Citizens of Bihar angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.