शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

तहकूब सभा पुढील आठवड्यात?

By admin | Updated: January 2, 2015 01:01 IST

सभेच्या तारखेवरून घोळ

सभेच्या तारखेवरून घोळनाशिक : ३० डिसेंबर रोजी तहकूब करण्यात आलेली सर्वसाधारण सभा पुढील आठवड्यात आठ किंवा नऊ तारखेला होण्याची शक्यता असून, सभा तहकुबीवरूनच सत्ताधार्‍यांमधील मतभेद उघड झाले होते. याच सभेत काही विषय पत्रिकेवर घेण्यावरून राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाल्याची चर्चा होती.अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांची अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने त्यांनी सभेचे कामकाज चालू ठेवण्याबाबत काहीशी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र नंतर सदस्यांचा व व्यासपीठावरील सहकार्‍यांचा एकूणच रोख पाहता त्यांना सभा तहकूब करावी लागली होती. याच सभेत काही महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी ठेवण्याची तयारी काही पदाधिकारी व सदस्यांनी ठेवल्याची चर्चा होती. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचाही जिल्हा परिषदेच्या सेस निधीतील जास्तीत जास्त कामांची मंजुरी या वर्षअखेर करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यातच निधीच्या असमान वाटपावरून काही पदाधिकारी व सदस्यांमध्ये असंतोष असल्याची दबक्या आवाजात जिल्हा परिषदेत चर्चा होती. जिल्हा परिषद सदस्य शंकर खैरे यांच्या निधनामुळे ही सभा तहकूब करण्याचा काही सदस्यांचा आग्रह असला तरी ते केवळ एक कारण होते. मात्र काही सदस्य व पदाधिकार्‍यांचा सभा तहकुबीकडे रोख होता, अशी आता चर्चा आहे. आता येत्या आठ किंवा नऊ जानेवारी रोजी ही तहकूब सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. कारण पुढील फेब्रुवारी महिन्यात अर्थ व बांधकाम सभापती व उपाध्यक्ष प्रकाश वडजे २०१४-१५ पुरवणी व २०१३-२०१४ चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)