शिवणीच्या ऑटोचालकाचा येवत्यात संशयास्पद मृत्यू

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:04+5:302015-09-14T00:39:04+5:30

बार्शीटाकळी : तालुक्यातील येवता येथे शिवणी येथील एका तरुण ऑटोचालकाचा मृतदेह १३ सप्टेंबरच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका शेतात निंबाच्या झाडाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेहाजवळ बीअरची बॉटल, एक ग्लास व एक गळफास दिसून आला. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

Suspicious death of Shikan's auto-driver | शिवणीच्या ऑटोचालकाचा येवत्यात संशयास्पद मृत्यू

शिवणीच्या ऑटोचालकाचा येवत्यात संशयास्पद मृत्यू

र्शीटाकळी : तालुक्यातील येवता येथे शिवणी येथील एका तरुण ऑटोचालकाचा मृतदेह १३ सप्टेंबरच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका शेतात निंबाच्या झाडाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेहाजवळ बीअरची बॉटल, एक ग्लास व एक गळफास दिसून आला. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शिवणी येथील रहिवासी असलेल्या संदीप तोताराम मांजरे या २८ वर्षे वयाच्या तरुण ऑटोचालकाचा मृतदेह रविवारी दुपारी २.३० वाजता येवता येथील अमोल हागे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली संशयास्पद स्थितीत पडलेला आढळून आला. सदर मृतदेहाच्या कमरेजवळ गळफासासारखी गाठ मारलेला दोर, डोक्याजवळ बीअरची अर्धवट भरलेली बॉटल व एक ग्लास पडून होता. त्यामुळे संदीपने आत्महत्या केली की त्याला काही घातपात झाला, याबाबत लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे.
या घटनेबाबत बार्शीटाकळी पोलिसांनी सीआरपीसी १७४ कलमान्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेबाबत ठाणेदार प्रकाश निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय लांडे, जमादार बाळासाहेब निस्ताने हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

Web Title: Suspicious death of Shikan's auto-driver