शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणपट्टय़ांचा भाग्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या हाती

By admin | Updated: September 9, 2014 03:58 IST

केंद्र सरकारने २१८ कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोडून दिला आहे. न्यायालयाने या खाणपट्टय़ांचे वाटप बेकायदेशीर घोषित केले होते.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २१८ कोळसा खाणपट्टे वाटप प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर सोडून दिला आहे. न्यायालयाने या खाणपट्टय़ांचे वाटप बेकायदेशीर घोषित केले होते. चालू वर्षात पाच कोटी टन कोळसा उत्पादन करण्यासाठी सुमारे ४0 खाणींमध्ये उत्पादन सुरू आहे आणि इतर सहा खाणी यासाठी तयार आहेत, असे सरकारने न्यायालयाला सांगितले.कोळसा मंत्रालयाने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचे १ मे रोजीचे वक्तव्य देखील आहे. न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केलेले वाटप रद्द केल्याबद्दल सरकारला आपेक्ष नाही तसेच सरकार लिलावासाठी विशेष प्रकारची पद्धती अवलंबण्यावर भरदेखील देत नाही, असे रोहतगी यांनी म्हटले होते. कोळसा उत्पादन करीत असलेल्या सुमारे ४0 खाणी आणि २0१४-१५ दरम्यान उत्पादन सुरू करणार्‍या संभावित सहा खाणींचे विवरण न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रतिज्ञापत्रात देण्यात आले. या खाणींमुळे चालू वर्षात सुमारे पाच कोटी टन कोळशाचे उत्पादन होईल, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कोळसा मंत्रालयाने कोळसा उत्पादन करीत असलेल्या ४0 खाणी आणि उत्पादनासाठी तयार असलेल्या सहा खाणींबाबत वाटप करणार्‍यांकडून मिळालेली माहिती न्यायालयात सादर केली. यामध्ये खाणपट्टे, उत्पादनाची सुरुवात आणि उत्पादनाचा अंतिम उपयोग आणि गुंतवणुकीबद्दलच्या माहितीचा समावेश आहे. उत्पादन करीत असलेल्या ४0 खाणींपैकी दोन खाणींचे वाटप अल्ट्रा मेगा वीज प्रकल्पासाठी करण्यात आले आहे. त्यांना २५ ऑगस्टच्या आदेशात बेकायदेशीर घोषित करण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)