शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सारांश जोड

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

समाजसेवा शिबिराचे आयोजन

समाजसेवा शिबिराचे आयोजन
नागपूर : मोमीनपुरा येथील डॉ. जाकिर हुसेन उर्दू डी. टी. एड. कॉलेजमध्ये वार्षिक समाजसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव हाजी तुफैल अशर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य एम. जे. वाघमारे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, माजी प्राचार्य प्रा. अनिल शर्मा, रफिक अहमद, कफिल अजहर उपस्थित होते.

भगवतीदेवी विद्यालयाचे स्नेहसंमेलन
नागपूर : भगवतीदेवी चौधरी प्राथमिक विद्यालय आणि शिशुमंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव केचे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद कानिटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून छगन पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे सहकार्यवाह वामन जोशी, मधुकर उदापुरे, विजय देव, गोपाल तिवारी उपस्थित होते.

सरदार भोलासिंग नायक विद्यालयाचे सुयश
नागपूर : सरदार भोलासिंग नायक विद्यालय हिवरीनगरच्या १३ विद्यार्थ्यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या आंतरशालेय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला. यातील ३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, एका विद्यार्थिनीला रजत पदक, ५ विद्यार्थ्यांना कांस्यपदक आणि प्रमाणपत्र तसेच शाळेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजयकुमार चिकनकर, शिक्षक देवीचंद चव्हाण, शुभांगी प्रेमलकल यांचे मार्गदर्शन लाभले.

चिरायु के. सी. बजाज अध्यापक
महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव
नागपूर : चिरायु के. सी. बजाज अध्यापक महाविद्यालय आणि श्रीमती कौश्यादेवी बजाज अध्यापक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कोषाध्यक्ष डिम्पी बजाज यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. सोनाली भारद्वाज, क्रीडा विभागप्रमुख प्रा. एस. राखडे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सोनाली भारद्वाज यांनी केले. संचालन प्रा. मोहतिसा इमरान यांनी केले. आभार प्रा. जवाहर वैद्य यांनी मानले.

बालनाट्य स्पर्धेत नारायणा विद्यालयाचे सुयश
नागपूर : भारतीय विद्याभवन सिव्हिल लाईन्सतर्फे आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत नारायणा विद्यालय चिंचभुवनच्या नाटकाला पाच विशेष पारितोषिक मिळाले. स्पर्धेत विद्यालयाला निर्मिती, उत्कृष्ट पटकथा, प्रकाश व्यवस्था, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पटकथालेखन, रश्मी पानसरे यांनी केले. त्यांना अंजली खेर, संजीवनी हातवळणे, मीना शुक्ला, अंकिता जांगळेकर, जगदीश वानखेडे, अतुल ठाकरे यांनी मदत केली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य माला चेंबथ यांना दिले.