शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आयआरएनएसएस -१ सी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: October 22, 2014 05:13 IST

भारतीय अंतराळ संशोधनात आणखी एक पल्ला गाठताना इस्रोने गुरुवारी पहाटे तिसरा स्थितीदर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ चे पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले.

श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधनात आणखी एक पल्ला गाठताना इस्रोने गुरुवारी पहाटे तिसरा स्थितीदर्शक उपग्रह ‘आयआरएनएसएस १ सी’ चे पीएसएलव्ही प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. अमेरिकेच्या जीपीएसच्या तोडीची स्वत:ची स्थितीदर्शक यंत्रणा स्थापन करण्याकडे भारताने भक्कम पाऊल टाकले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्रोची प्रशंसा केली.इस्रोने इंडियन रिजनल नेव्हिगेशन उपग्रह यंत्रणेअंतर्गत सात उपग्रह अवकाशात सोडण्याची योजना आखली असून आयआरएनएसएस १ सी हा उपग्रह त्याचाच एक भाग आहे. प्रथमच वर्षभरात चार यशस्वी प्रक्षेपण करण्याचा अनोखा मानही भारताने पटकावला आहे.पहाटे १.३२ वाजता स्पेस पोर्टच्या पहिल्या लाँच पॅडवरून हा उपग्रह पाठीमागे अग्निज्वाळा सोडत अंधाऱ्या अवकाशात झेपावल्यानंतर २० मिनिटांनी पीएसएलव्ही प्रक्षेपकाने १४२५.४ किलो वजनाच्या उपग्रहाला नियोजित कक्षेत यशस्वीरीत्या सोडले. पृथ्वीपासूनचे सर्वात कमी अंतर २८४ कि. मी., तर पृथ्वीपासूनचे सर्वाधिक अंतर २०,६५० कि. मी. अशा वर्तुळाकार कक्षेत १७.८६ अंशावर हा उपग्रह स्थिरावला तेव्हा प्रक्षेपण यशस्वी झाल्याबद्दल टाळ्या वाजवून वैज्ञानिकांनी आनंद व्यक्त केला. प्रक्षेपण यशस्वी झाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी दिली. (वृत्तसंस्था)