शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’वरील लस विकसित करण्यात पुण्यातील " या " संस्थेला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 21:58 IST

पुढील सहा महिन्यात या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार

ठळक मुद्देसिरम संस्थेमध्ये संशोधन सुरू : २०२२ मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागणाररोगप्रतिकारशक्ती वाढवून एकप्रकारचे सुरक्षाकवच तयार करत असल्याचा संस्थेचा दावा चीनमध्ये आतापर्यंत १८०० हून अधिक जणांचा मृत्यू

पुणे : चीनसह जगभरातील विविध देशांमध्ये फैलाव झालेल्या कोरोना विषाणुला रोखणारी लस विकसित करण्यात पुण्यातील सिरम इस्टिट्युट ऑफ इंडियाला यश मिळाले आहे. ही लस विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी कमी वेळेत रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यात या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असून त्यानंतर २०२२ पर्यंत ही लस प्रत्यक्ष तयार होईल. 
   कोरोना विषाणुची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत १८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास पाऊण लाख नागरिकांना या विषाणुने विळखा घातला आहे. भारतासह जगातील अन्य काही देशांमध्येही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरातील संस्थांमध्ये यावर संशोधन सुरू आहे. यामध्ये भारताने आघाडी घेतली आहे. सिरम संस्थेतील संशोधकांनी अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने ही लस विकसित केली आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या लसीच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. कमी कालावधीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवून एकप्रकारचे सुरक्षाकवच तयार करत असल्याचा संस्थेचा दावा आहे.
पुढील आठवड्यापासून उंदीर आणि माकडावर त्याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहे. त्याचे निष्कर्ष दीड-दोन महिन्यांमध्ये समोर येतील. मानवी चाचण्या घेण्यासाठी अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या चाचण्या पुढील वर्षभर सुरू राहू शकतात. या चाचण्यांमध्ये येणाऱ्या निष्कर्षांनुसार लसीवर संशोधन केले जाईल. लसीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी किमान दीड-दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतरच उत्पादन सुरू करता येणार आहे.
----------------
लसीच्या प्राथमिक संशोधनासाठी ‘कोडोजेनिक्स’ या अमेरिकन कंपनीशी सिरम संस्थेने करार केला आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच संशोधन सुरू आहे. त्याआधारे चीनमधील नोवेल कोरोना विषाणुशी साधर्म्य असलेला जेनेटिक विषाणु तयार करण्यात आला. त्यामुळेच एवढ्या कमी कालावधीत लस विकसित करण्यात यश मिळाले आहे. अन्यथा यापुर्वी इतर लसी विकसित करण्यासाठी ६-७ वर्षांचा कालावधी लागला आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत लस विकसित करता आली आहे. - आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी सिरम संस्था.


 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यcorona virusकोरोनाCentral Governmentकेंद्र सरकार