शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रतो राय यांना हॉटेल विक्रीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ

By admin | Updated: September 9, 2014 03:37 IST

सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो राय यांना न्यूयॉर्क आणि लंडन येथील तीन आलिशान हॉटेल विक्रीच्या व्यवहाराला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सहारा प्रमुख सुब्रतो राय यांना न्यूयॉर्क आणि लंडन येथील तीन आलिशान हॉटेल विक्रीच्या व्यवहाराला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राय यांना सेबीकडे १0 हजार कोटी रक्कम जमा करायची आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका होऊ शकणार आहे. ही मालमत्ता विक्री करण्यासंदर्भात परदेशी खरेदीदारांशी सौदा जवळपास पक्का झाला होता. परंतु आता तो रद्द होण्याच्या उंबरठय़ावर आहे.हे हॉटेल खरेदी करण्यास इच्छुक तीन ते चार इतर परदेशी खरेदीदारांना चर्चा करून सौद्याला अंतिम रूप देण्यासाठी आणखी वेळ हवा आहे, असे राय यांच्या वकिलाने न्यायमूर्ती तिरथसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला सांगितले. न्यायालयाने संभावित खरेदीदारांशी झालेला समझोता आणि इतर दस्तऐवजाचे अवलोकन केले. त्यानंतर न्यायालयाने सौद्याला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न झाल्याची टिप्पणी केली आणि यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या संपत्तीच्या विक्रीला अंतिम रूप देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याची विनंती मान्य केली जाते, असा आदेश न्यायाधीशांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाने राय यांना तिहार कारागृहात राहून संभावित खरेदीदारांशी चर्चा करण्यासाठी १0 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राय यांनी न्यूयॉर्कमधील ड्रीम डाऊनटाऊन आणि द प्लाझा तसेच लंडन येथील ग्रासवेनर हाऊस विक्रीसाठी काढले आहे. राय गेल्या सहा महिन्यांपासून तिहार कारागृहात आहेत. सहारा समूहाला सर्वोच्च न्यायालयात कार्यवाही समाप्त करण्यासाठी सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)