न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 10:54 IST2026-05-16T10:52:46+5:302026-05-16T10:54:51+5:30

सुनावणीबाबत जाहीरपणे उलटसुलट विधाने करणे उद्धवसेनेच्या अंगलट, उद्धवसेनेच्या नेत्यांची न्यायव्यवस्थेविरुद्धची विधाने सहन करण्यासारखी नाहीत, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.

Stop accusing the court of delaying the decision; Court warns Uddhav Sena | न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा

न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीबाबत जाहीरपणे उलटसुलट विधाने करणे उद्धवसेनेच्या चांगलेच अंगलट आले. उद्धवसेनेच्या नेत्यांची न्यायव्यवस्थेविरुद्धची विधाने सहन करण्यासारखी नाहीत. ती आधी थांबवा, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला ताकीद दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी होणार आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठापुढे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाची सुनावणी पार पडली.  उद्धवसेनेचे वकील ॲड. देवदत्त कामत यांनी या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली. 

यावर कठोर भूमिका घेत सरन्यायाधीश सूर्यकांत हे ठाकरे गटाच्या वकिलाला म्हणाले की, 'सर्वांत आधी तुम्ही ठाकरे गटाच्या नेत्यांना मीडियासमोर बेजबाबदारपणाचे विधाने करण्यापासून थांबवा. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निर्णय घेत नाही, अशाप्रकारची विधाने करीत आहात. 

सरन्यायाधीश म्हणाले... 

सरन्यायाधीश म्हणाले, तुम्ही इथे येऊन सुनावणीची तारीख मागता आणि बाहेर जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही असे विधाने करता. तुम्हाला युक्तिवाद करायचा नाही, फक्त वक्तव्ये करायची आहेत. आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत. तुमचे शब्द जपून वापरा. मी असे वर्तन सहन करणारा माणूस नाही. यानंतर कामत यांनी न्यायालयाच्या सोयीनुसार खटला चालविण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले.

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, आम्ही चार वाजेपर्यंत इथे बसतो. आम्ही रिकामे बसलो आहोत असे कोणाला वाटत असेल, तर ते आम्हाला समजू शकत नाही.
 

Web Title : न्यायालय पर देरी का आरोप लगाना बंद करो: सुप्रीम कोर्ट ने उद्धव सेना को चेतावनी दी।

Web Summary : सुप्रीम कोर्ट ने शिवसेना प्रतीक मामले में न्यायपालिका की सार्वजनिक आलोचना के लिए उद्धव ठाकरे गुट को फटकार लगाई। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत ने मीडिया में गैरजिम्मेदाराना बयानों के खिलाफ चेतावनी दी, अदालत की तत्परता पर जोर दिया और अगली सुनवाई 30 जुलाई को निर्धारित की।

Web Title : Stop accusing court of delay: Supreme Court warns Uddhav Sena.

Web Summary : The Supreme Court reprimanded the Uddhav Thackeray faction for publicly criticizing the judiciary regarding the Shiv Sena symbol case. Chief Justice Suryakant cautioned against irresponsible statements in the media, emphasizing the court's diligence and setting the next hearing for July 30th.