शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना; अखेर कर्नाटक सरकार झुकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:49 IST

बैठकीत निर्णय; कर्नाटक सरकारबद्दल रोष कायम

बेळगाव : आठ दिवसांत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून हुक्केरी तालुक्यातील मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा हटविल्याने निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मणगुत्ती येथे उभारण्यात आलेल्या चबुतऱ्यावर बुधवारी शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याला गावातील एका गटाचा विरोध होता. शुक्रवारी रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली होती. सीमाभागाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पत्र पाठवून शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याची मागणी केली होती. रविवारी महाराष्टÑातही ठिकठिकाणी कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. रविवारी सकाळी अतिरिक्त पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी आणि हुक्केरीचे तहसीलदार व गावातील पंचांची बैठक झाली. त्यात आठ दिवसांत पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय झाला. दुपारनंतर बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनीदेखील मणगुत्ती गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांमध्ये मात्र रोष कायम आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज