शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

कमलनाथ सरकारचा वादग्रस्त नसबंदीचा आदेश अखेर मागे, कर्मचाऱ्यांना दिलं होतं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:12 IST

टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने वादग्रस्त नसबंदीबाबतचा आदेश अखेर मागे घेतला आहे. आरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांनी आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. "नसबंदीचा आदेश मागे घेण्यात येत आहे. आम्ही कोणालाही सक्ती करणार नाही आणि  या आदेशाचा अभ्यास करू. तसेच, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक भारद्वाज यांची बदली झाली असून त्यांची सचिवालयात ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", असे तुलसीराम सिलावट यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना बंधनकारक निवृत्ती देणार असेही सांगितले होते. यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. त्यानंतर हा आदेश कमलनाथ सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारच्या या निर्णयाला आणीबाणी 2 म्हटले आहे. "मध्य प्रदेशात अघोषित आणीबाणी आहे. हा काँग्रेसचा आणीबाणी भाग-2 आहे? एमपीएचडब्ल्यूचे काम करण्यात कमी असल्यास सरकारने कारवाई केली पाहिजे, पण लक्ष्य साध्य न केल्यास पगार रोखून निवृत्त करण्याचा निर्णय हुकूमशाही आहे." असे म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी यांनी कमलनाथ सरकारवर टीका केली. 

याशिवाय, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही कमलनाथ सरकारचा हा आदेश म्हणजे इंदिरा गांधींच्या काँग्रेसप्रणित आणीबाणीचा काळ आठवण करून देणारा आहे, अशी टीका कमलनाथ यांच्यावर केली. ते म्हणाले, "आपणास आणीबाणीचा काळ माहिती आहे. तेव्हाची काँग्रेस सरकारची आणीबाणीच्या काळातील नसबंदीची धोरणे अशाच प्रकारची होती. कमलनाथ हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत, त्यामुळे ते अशाप्रकारचे निर्णय घेत आहेत. काँग्रेसशासित सर्व राज्यांची आज हीच स्थिती आहे", असे  संबित पात्रा म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा