शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रमेव जयते’ योजनेचा थाटात प्रारंभ

By admin | Updated: October 22, 2014 05:14 IST

कामगार कायद्यांतील सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़

नवी दिल्ली : कामगार कायद्यांतील सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़ या कार्यक्रमाअंतर्गत ‘श्रम सुविधा पोर्टल’, ‘लेबर इन्स्पेक्शन स्कीम’, तसेच भविष्य निर्वाह निधी (पीए) जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकच कायमस्वरूपी अकाऊंट नंबर (युनिव्हर्सल नंबर) या योजना त्यांनी जारी केल्या़येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़ यावेळी केंद्रीय श्रम रोजगार, पोलाद व खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर, आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री हर्षवर्धन, अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, लघु व मध्यम उद्योगमंत्री कलराज मिश्र आदी उपस्थित होते़या सर्व योजना म्हणजे रालोआ सरकारच्या ‘किमान सरकार आणि कमाल सुशासन’च्या दिशेने केलेली सुरुवात असल्याचे मोदी यावेळी म्हणाले़ ‘सत्यमेव जयते’ची जेवढी शक्ती आहे तेवढीच शक्ती ‘श्रमेव जयते’ ची असणार आहे़ दुर्दैवाने आज देशात श्रम करून घाम गाळणाऱ्यांचा आदर केला जात नाही़ हे बदलायचे असेल तर आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे़ या दिशेने काही ठोस प्रयत्न झाले पाहिजे़ ‘श्रमेव जयते’ ही योजना याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले़ ‘लेबर इन्स्पेक्शन’द्वारे इस्पेक्टर राज संपुष्टात आणून अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले़ सरकारने १६ फॉर्म (जे मालकाने भरायचे असतात) एका फॉर्ममध्ये बदलले आहेत आणि हा फॉर्म आॅनलाईन उपलब्ध आहे़ कोणता निरीक्षक कोणत्या कारखान्याचे निरीक्षण करणार ते आता संगणक ठरवेल़ निरीक्षणानंतर ७२ तासांत त्याला अहवाल अपलोड करावा लागेल़ सरकारच्या या सुधारणा हेच ‘किमान सरकार आणि कमाल सुशासन’ आहे, असेही ते म्हणाले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)