शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प.बंगाल आणि आसाममध्ये उत्स्फूर्त मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2016 19:42 IST

प. बंगालमध्ये पहिल्या टप्पातील उर्वरित ३१ तर आसामात दुसऱ्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये ७१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली.

किरकोळ हिंसाचार : आसामच्या बारपेटा जिल्ह्यात एक ठारकोलकाता/ गुवाहाटी : प. बंगालमध्ये पहिल्या टप्पातील उर्वरित ३१ तर आसामात दुसऱ्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही राज्यांमध्ये ७१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. आसाममध्ये तुरळक हिंसाचारात एक जण ठार झाला.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे १९९१ पासून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी दिल्लीहून दिसपूर येथे जाऊन तेथील शासकीय शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. आसामचे कुस्तीपटू शिव थापा यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले. आसाममध्ये १२,६९९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपेपर्यंत रांगा लागल्या होत्या. प. बंगालमधील पश्चिम मिदनापूर मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत विक्रमी ७६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. बांकुरा ७०.८० तर बर्दवानमध्ये ६८ टक्के मतदान झाले. (वृत्तसंस्था)-----------------------------सीआरपीएफकडून हवेत गोळीबार...कामरूप जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका जवानाने गर्भवती महिलेसोबत गैरवर्तन केल्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी निदर्शने केली असता सुरक्षा दलाने त्यांना पांगविण्यासाठी हवेत गोळीबार केला. चायगोन येथील नित्यसार खुलाबाजार एलपी शाळेतील मतदान केंद्रावर एक महिला बाळाला घेण्यासाठी पुन्हा मतदानकक्षात जात असताना एका जवानाने तिला रोखल्यामुळे जमाव संतप्त झाला होता. आसामच्याच बारपेटा जिल्ह्यातील सोरभोग मतदारसंघात सीआरपीएफ आणि मतदारांमध्ये झालेल्या संघर्षात ८० वर्षीय वृद्ध ठार झाला तर दोन जवानांसह तिघे जखमी झाले.