शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष केंद्र

By admin | Updated: September 20, 2015 22:48 IST

केंद्र सरकार सायबर गुन्हे हाताळण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन लैंगिक छळाला आळा घालण्याला हे केंद्र शीर्ष प्राधान्य देणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकार सायबर गुन्हे हाताळण्यासाठी एक अत्याधुनिक केंद्र स्थापन करणार आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन लैंगिक छळाला आळा घालण्याला हे केंद्र शीर्ष प्राधान्य देणार आहे.सायबर गुन्हे प्रभावीपणे हाताळण्याच्या दिशेने रोडमॅप तयार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेषज्ञ समितीने केंद्रीय गृहमंत्रालयाला आपला अहवाल सादर केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे. बालके आणि महिलांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यात, विशेषत: आॅनलाईन लैंगिक छळाच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर घट केली जाण्याची आवश्यकता असल्याचे मत या समितीने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे.या समितीने आपल्या अहवालात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारचे अश्लील साहित्य आणि वेबसाईटस्ची निगराणी आणि त्या वेबसाईटस् बंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच संबंधित कायदेही कडक बनविण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या सायबर जगताबाबतच्या कारवायांवर निगराणी ठेवण्यासाठी पालकांनी आता शिक्षित होण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी बालकांना सायबर मंचावर चांगल्या व्यवहाराबाबत शिक्षित केले पाहिजे.या समितीने केलेल्या शिफारशीनुसार, चाईल्ड पोर्नोग्राफी आणि आॅनलाईन अत्याचारासह अन्य सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ४०० कोटी रुपये खर्चाचे ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ (आयसी ४) या नावाने एक सायबर गुन्हे नियंत्रण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. हे आयसी ४ केंद्र विविध प्रकारचे गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहिती ठेवणाऱ्या सीसीटीएनटी व एनएटीजीआरआयडी या संस्थांना जोडण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी याआधीच समितीच्या शिफारशींची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.