कळमन्यातील गोदामातून सोयाबीनची चोरी

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:06+5:302014-12-25T22:41:06+5:30

नागपूर : कळमन्यातील गोदामातून चोरट्यांनी दीड लाखाचे सोयाबीन चोरून नेले. कापसी बुजुर्ग (कळमना) परिसरात घडलेली ही चोरीची घटना २२ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली.

Soya bean burial in the karman godown | कळमन्यातील गोदामातून सोयाबीनची चोरी

कळमन्यातील गोदामातून सोयाबीनची चोरी

गपूर : कळमन्यातील गोदामातून चोरट्यांनी दीड लाखाचे सोयाबीन चोरून नेले. कापसी बुजुर्ग (कळमना) परिसरात घडलेली ही चोरीची घटना २२ डिसेंबरला सकाळी उघडकीस आली.
कैलास नागरमल सोनी (वय ४४, रा़ ओम अपार्टमेंट, जलाराम नगर, नागपूर) यांचे कळमना कापसी बुजुर्ग, येथे समृद्धी टे्रडिंग कंपनी नावाचे गोदाम आहे. चोरट्यांनी गोदामाच्या शटरचे लॉक तोडले आणि आतमधून सोयाबीनचे ४४ पोते चोरून नेले. या सोयाबीनची किंमत १ लाख ५४ हजार रुपये आहे. सोनी यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: Soya bean burial in the karman godown