शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर तालुक्यात पेरणीला सुरुवात

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

अर्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्‍यांत घाई झाली आहे़

अर्धापूर : तालुक्यात मृग नक्षत्राने सुरुवात केलेल्या चांगल्या पावसाने पेरणीला सुरुवात झाली असून सोयाबीन, हळद व कापसाच्या पेरण्याची शेतकर्‍यांत घाई झाली आहे़
तालुक्यात आतापर्यंत ३९ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे़ तालुक्यात २०१५-१६ या वर्षात ज्वारी १७१० हेक्टर, तूर १२०० हेक्टर, मुग ६५० हे़, उडीद ३४६ हे़, कापूस ४ हजार हे़, ऊस ५ हजार, सोयाबीन ९ हजार हेक्टर असे एकूण २२ हजार २६० हेक्टरक्षेत्र अंदाजे पेरणीखाली राहील़ शेतकर्‍यांकडे सोयाबीनचे २६४८ क्विंटल बियाणे उपलब्ध असून ३५८१ क्विंटल नावनिहाय बियाणे पुरवठा होणार आहे़ ४५० ग्रॅम वजनाची २१ हजार २३९ पाकीटे कापूस वितरणाची आवश्यकता असताना आतापैकी ११ हजार ४४७ पाकीटे पुरवठा झाली आहेत़
तालुक्यासाठी युरिया ४३७८ मे़टन, डीएपी ३३४८, म्युरेट ऑफ पोटॅश ११८५ मे़टन, सुपर फॉस्फेट १४८३ मे़टन, संयुक्त खते २६६८ मे़टन, इतर २३३ मे़ टन अशा एकूण १३२९२ मे़ टन खताची मागणी मे अखेरपर्यंत ४४२९ मे़टन खताचा पुरवठा झाल्याची माहिती पंचायत समितीच्या कृषी अधिकारी गार्गी स्वामी यांनी दिली़
कोट
तालुक्यातील ४० कृषी सेवा केंद्रात खत व बियाणे वाटप सुलभतेसाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुका कृषी अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक कार्यरत आहे - बी़पी़ पाटील, मंडळ कृषी अधिकारी, अर्धापूऱ