शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:22 IST

Uttar Pradesh Crime News: दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.

दोन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमधून २०-२५ माणसं भरून आणून एका जावयाने सासरवाडीमध्ये तुफान राडा केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. लग्नानंतर महिनाभरातच या जावयाने त्याचं सासर असलेल्या रसौली गावात माणसं आणून सासरच्या मंडळींवर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जावयाने सासरच्या मंडळींवर केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये गावात आलेली रुग्णवाहिका आणि दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये होत असलेली हाणामारी दिसत आहे.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गावात घुसलेल्या रुग्णवाहिका आणि व्हॅन पाहून लोकांना सुरुवातीला काही समजले नाही. त्यानंतर या वाहनांमधून उतरलेल्या तरुणांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी चेन आणि धारदार हत्यारांद्वारे सासरच्या मंडळींवर हल्ला चढवला. यात दोन्ही बाजूचे मिळून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेत जखमी झालेल्या नईमा बानो यांनी सांगितले की,  माझी मुलगी झोया हिचं लग्न २० जून रोजी लखनौमधील मोहम्मद दानिश याच्यासोबत लावून दिलं होतं. तर या घटनेत जखमी झालेल्या झुबेर याने सांगितले की, दानिश हा तीन रुग्णवाहिका आणि एका व्हॅनमध्ये २० ते २५ जणांना भरून घेऊन आला. या सर्वांकडे लाठ्याकाठ्या, धारदार हत्यारे होती. इथे येताच त्याने कोण अडवतो ते पाहू असं आव्हान दिलं आणि मारहाण सुरू केली. यादरम्यान, मध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्थांनाही बेदम मारहाण केली गेली. मोहम्मद दानिश हा गावच्या गल्लीबोळातून सुसाट गाडी चालवायचा. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याच्याबाबत रोष होता. मात्र त्याला अडवले तर मला कोण अडवतो ते बघतो, अशी धमकी द्यायचा.

दरम्यान, या हाणामारीत दानिश हासुद्धा जखमी झाला असून, त्याने ग्रामस्थांवर उलट आरोप केला आहे. गावातील काही तरुण माझी मेहुणी आमि इतर बहिणींची छेड काढायचे. मी मित्रांसोबत त्यांना समजावण्यासाठी आलो असता, त्यांनी माझ्यावरच हल्ला केला. असा आरोप त्याने केला.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश