शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

...तर दाऊद इब्राहिम भारतात येण्यास तयार

By admin | Updated: November 8, 2016 03:16 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. आपणास मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात ठेवू नये, अशी अट त्याने पूर्वीही घातली होती

नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या जुन्या अटींवर भारतात येऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. आपणास मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात ठेवू नये, अशी अट त्याने पूर्वीही घातली होती, असा दावा दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी केला आहे. तसेच यासंदर्भात दाऊदसोबत चर्चा करावी लागेल, असेही केसवानी यांनी सांगितले. अ‍ॅड केसवानी म्हणाले की, आर्थर रोड जेलमध्ये न ठेवण्याची अट दाऊदने पाच वर्षांंपूर्वी सरकारसमोर ठेवली होती. मात्र, तत्कालीन सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते, असे सांगून अ‍ॅड केसवानी म्हणाले की, दाऊदच्या एका माणसाने माजी मंत्री व ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांची लंडनमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी ही अट जेठमलानींसमोर ठेवण्यात आली होती.दाऊदची अट अमान्य करणाऱ्या तेव्हाच्या तत्कालीन सरकारने अबू सालेम आणि छोटा राजनच्या अटी मान्य करत त्यांना भारतात आणले, असा गौप्यस्फोटही केसवानी यांनी केला. अबू सालेमने आपल्यावर फाशीच्या शिक्षेचा आरोप लावू नये, अशी अट घातली होती आणि छोटा राजनने आपणास तिहार जेलमध्ये न ठेवण्याची अट ठेवली होती. त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या सरकारने दाऊदच्या अटीकडे दुर्लक्ष केले, असा दावा केसवानी यांनी केला आहे. केसवानी यांच्या म्हणण्यानुसार दाऊदची अट किरकोळ आहे. तरीही सरकार दाऊदला भारतात आणायला तयार नाही. यामागे दुसरेच काही कारण आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. दाऊदला सुरक्षिततेची हमी मिळाल्यास, तो भारतात येईल. याआधीही सुरक्षेच्या अटीवरच त्याने भारतात येण्यास सहमती दर्शवली होती, असेही केसवानी यांनी म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)