शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:25 IST

Kashmir Weather Update : काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.

'आयएमडी'नुसार रविवारपर्यंत काश्मीरच्या पर्वतीय भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारपासून आणखी एका पश्चिमी विक्षोभाच्या परिणामाने पुन्हा वातावरणात मोठा बदल होईल. यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत अनेक भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गुलमर्गमध्ये तापमान उणे १२ अंशांवर असून गांदरबलमध्ये उणे १०.५ अंश तापमानाची शुक्रवारी रात्री नोंद झाली. उर्वरित भागांत तापमान उणे ८ ते उणे ४ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. इकडे उत्तरकाशी व चामोलीतही थांबून-थांबून हलकी बर्फवृष्टी सुरू असून उत्तरेतील पाच राज्यांत हलका पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बर्फवृष्टीमुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशात पाऊस सुरू आहे.

दिल्लीत थंडीचा कडाका
दिल्लीत शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी कडाक्याची थंडी होती. तापमान १४ ते ७ अंशांदरम्यान होते. बहुतांश भागांत दाट धुके होते. तर, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक शनिवारी सकाळी २५६ वर होता.

उत्तरेत थंडी कायम
राजस्थानात थंडीची लाट कायम असून भरतपूरसह काही भागांत हलका पाऊस झाल्याने थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. काही भागांत गारा पडल्या आहेत. पंजाब, हरयाणातही थंडी प्रचंड वाढली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये पारा ५ ते १० अंशांवर होता.

एअर इंडियाने न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी सर्व विमाने केली रद्द
मुंबई : अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ जानेवारी रोजी येथे जाणारी सर्व विमाने एअर इंडियाने रद्द केली आहेत. त्यामुळे न्यूयॉर्क, नेवार्क, न्यूजर्सी तसेच त्या परिसरातील अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार नाहीत. थंडीचा फटका किमान १५ राज्यांना बसला असून तेथे विमानसेवा चालवणे शक्य नसल्याने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा कंपनीने सोशल मीडियाद्वारे केली. ज्या प्रवाशांनी तेथील राज्यांसाठी विमानांचे तिकीट काढले आहे, त्यांनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन देखील कंपनीने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashmir snowfall stops; flight services resume, night temperature still sub-zero.

Web Summary : Kashmir's flight services resumed after snowfall stopped, but temperatures remained below freezing. Northern India experiences cold weather, with rain in Delhi, Rajasthan, and Uttar Pradesh. Air India canceled flights to the US East Coast due to fog.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरweatherहवामान अंदाज