स्लॅब अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

By Admin | Updated: December 20, 2014 22:26 IST2014-12-20T22:26:58+5:302014-12-20T22:26:58+5:30

नागपूर : एमआयडीसीतील ग्रेड लाईन कंपनीतील इमारतीची स्लॅब अंगावर पडून रामराज तवेलाल लिल्हारे (वय ४५) या मजुराचा करुण अंत झाला. आज दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Slab on the body of a laborer | स्लॅब अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

स्लॅब अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू

गपूर : एमआयडीसीतील ग्रेड लाईन कंपनीतील इमारतीची स्लॅब अंगावर पडून रामराज तवेलाल लिल्हारे (वय ४५) या मजुराचा करुण अंत झाला. आज दुपारी २ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
कंपनीतील इमारतीची भिंत तोडताना ही दुर्घटना घडली. ईशूलाल दुल्लूलाल लिल्हारे (वय ४५) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रामराज यांच्या मृत्यूमुळे त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करावे आणि मृत लिल्हारेच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
----

Web Title: Slab on the body of a laborer