शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू, साक्षी, दीपाला खेलरत्न पुरस्कार जाहीर

By admin | Updated: August 22, 2016 21:19 IST

५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला भारता सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ : रिओमध्ये बॅडमिंटन महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक तसेच ५२ वर्षांत भारताला पहिल्यांदा जिम्नॅस्टिकमध्ये सन्मान मिळवून देणारी दीपा कर्माकरला भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या तीन कन्यांवर भारतातून कौतुक आणि बक्षिसांचा वर्षाव होत असतानाच भारत सरकारने त्यांना खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान वाढवला आहे. भारताचा उत्कृष्ट नेमबाज जितू रायलाही भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

साक्षीने यंदा देशाला पहिले पदक मिळवून दिल्याने खेलरत्नची ती सर्वांत मोठी दावेदार बनली. ५२ वर्षांत पहिल्यांदा भारतीय जिम्नॅस्ट म्हणून रिओत उतरलेल्या त्रिपुराच्या २३ वर्षांच्या दीपाने वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरीसह चौथे स्थान घेतले. तर सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला रौप्य पदक मिळवून दिले. वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना खेलरत्न दिले जाऊ शकेल, अशी सरकारने आधीच घोषणा केली होती. त्यामुळे खलरत्नसाठी एका पेक्षा जास्त खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. खेलरत्नसाठी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याचे नाव देखील होते. पण ऑलिम्पिकमुळे त्याची दावेदारी कमकुवत बनली. याशिवाय टिंटू लुका, अनिर्बान लाहिरी, विकास गौडा, मिताली राज आणि दीपिका पल्लीकल हिच्यासह दहा खेळाडूंनी आपापल्या महासंघांकडून अर्ज पाठविले होते.