शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी बर्फवृष्टी, धुके व पूर; तीन राज्यांत वेगवेगळे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 06:16 IST

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी; झारखंडमध्ये धुके अन् तामिळनाडूत पुराने कहर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. काश्मीरच्या मैदानी भागात शनिवारी हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाली असून, उत्तर भारतात थंडीने हुडहुडी भरली आहे. झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली असताना दुसरीकडे तामिळनाडूत मात्र पुराने कहर केला असून, अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. 

काश्मीर : काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मू आणि काश्मीर व लडाखमधील शिखरांवर जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. शनिवारी श्रीनगरमध्ये तीन इंच बर्फ पडला.  यामुळे अनेक महामार्ग बंद होते.

सिक्कीमसाठी ठरले वाईट वर्षवर्ष सरत आले तरी तिस्ता नदीला आलेल्या पुराच्या कटू आठवणी सिक्कीमच्या नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील. ४ ऑक्टोबर रोजी उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आल्याने किमान ४२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर, ७७ जण बेपत्ता झाले होते आणि हजारो लोक बेघर झाले होते. या घटनेत किमान १,१७३ घरांचे नुकसान झाले. तर मंगन जिल्ह्यातील चुंगथांग जलविद्युत प्रकल्प असलेले धरण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

तमिळनाडूत पूरग्रस्तांना दिलासामिचाँग चक्रीवादळामुळे पाऊस आणि पुरामुळे तामिळनाडूत मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी रविवारी नुकसान झालेल्या कुटुंबीयांना ६००० रुपयांची रोख मदत देणे सुरू केले आहे. रोख मदत देण्यासाठी राज्य सरकारने १,४८६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

माऊंटअबू येथे पारा उणे १ अंशावरnशनिवारी मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातील अनेक भागांत हलका पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. nउत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी धुके पसरण्यासह पारा घसरला आहे. सकाळी राजधानी दिल्लीतील अनेक भागांत पाऊस झाला. nसंपूर्ण शहरात धुकेही पसरले आहे. राजस्थानातील माऊंटअबू येथे पारा उणे १ अंशावर गेला आहे. हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे पंजाब, हरयाणातील हवामान बदलले आहे. महाराष्ट्रात दुपारी कडक उन तर रात्री थंडी पडत आहे.

टॅग्स :Rainपाऊस