Odisha Train: धावत्या रेल्वेतून मुलगा पडला, आपत्कालीन साखळी ओढूनही थांबली नाही ट्रेन, बहिणीचा टाहो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:05 IST2026-04-27T15:58:05+5:302026-04-27T16:05:52+5:30

Odisha Train Incident: ओडिशामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान एक थरारक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली. 

Shocking Negligence: Train Doesnt Stop Despite Passengers Pulling Emergency Chain in Odisha | Odisha Train: धावत्या रेल्वेतून मुलगा पडला, आपत्कालीन साखळी ओढूनही थांबली नाही ट्रेन, बहिणीचा टाहो!

Odisha Train: धावत्या रेल्वेतून मुलगा पडला, आपत्कालीन साखळी ओढूनही थांबली नाही ट्रेन, बहिणीचा टाहो!

ओडिशामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान एक थरारक आणि तितकीच संतापजनक घटना घडली. जलपाईगुडी-रामनगर एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करताना एक मुलगा ट्रेनमधून खाली पडला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, प्रवाशांनी तातडीने 'अलार्म चेन' म्हणजेच आपत्कालीन साखळी ओढूनही ट्रेन थांबली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून संबंधित मुलाची बहीण मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसत आहे. या घटनेनंतर रेल्वे विभागात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात जलपाईगुडी-रामनगर एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडला. एक मुलगा आपल्या बहिणीसह प्रवास करत असताना धावत्या ट्रेनमधून खाली पडला. डोळ्यांदेखत भावाला पडल्याचे पाहून  बहिणीने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मुलगा खाली पडल्याचे समजताच प्रवाशांनी डब्यातील आपत्कालीन साखळी ओढली. मात्र, तरीही ट्रेन थांबली नाही. प्रवाशांचा असा दावा आहे की, आपत्कालीन साखळी ओढल्यानंतरही यंत्रणेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, ज्यामुळे मुलाला वाचवण्यासाठी किंवा त्याला शोधण्यासाठी ट्रेनमधून उतरता आले नाही. मुलगा पडल्यानंतर ट्रेन जवळपास १० ते १५ किलोमीटर पुढे आली.

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष की तांत्रिक बिघाड?

या घटनेनंतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. "जर साखळी ओढल्यावरही गाडी थांबत नसेल तर, अशा आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग काय? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही यंत्रणा निकामी झाली होती की, रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले? याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

Web Title : ओडिशा में ट्रेन से गिरा लड़का; इमरजेंसी चेन हुई विफल!

Web Summary : ओडिशा में चलती ट्रेन से एक लड़का गिर गया। यात्रियों ने इमरजेंसी चेन खींची, लेकिन ट्रेन नहीं रुकी। लड़के की बहन मदद के लिए चिल्लाई क्योंकि ट्रेन 10-15 किलोमीटर तक चलती रही। यात्री आक्रोशित हैं, आपातकालीन प्रणाली की विफलता पर सवाल उठा रहे हैं और जांच की मांग कर रहे हैं।

Web Title : Boy Falls from Train in Odisha; Emergency Chain Fails!

Web Summary : A boy fell from a moving train in Odisha. Passengers pulled the emergency chain, but the train didn't stop. The boy's sister cried for help as the train continued for 10-15 kilometers. Passengers are outraged, questioning the emergency system's failure and demanding an investigation.