शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पहिल्याच रात्री धक्का; टक्कल लपवणाऱ्या पतीचे सत्य उघड, पत्नीचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:45 IST

पतीला टक्कल पडली होती. तो विग वापरत होता, लग्न ठरत असताना त्याने विग वापरले होते.

लग्न हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण आहे. असेच नोएडा मध्ये एका तरुणाचा आणि तरुणीचा विवाह झाला. लग्नाच्या मंडपात सात फेरे घेताना कोणीही विचार केला नव्हता  हे नाते फक्त काही दिवसांचे असणार. वधूने ज्याला आपला जीवनसाथी निवडले, त्याने सत्य लपवले होते. ही घटना ग्रेटर नोएडा येथील आहे.

पतीला टक्कल पडली होती. तो विग वापरत होता, लग्न ठरत असताना त्याने विग वापरले होते.  नाते तुटल्यानंतर अनेक आरोप केले. टक्कलपणा लपवून लग्न करणाऱ्या पतीने नंतर केवळ तिला छळलेच नाही, तर तिच्या खाजगी फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसेही घेतले. विरोध केल्यानंतर मारहाण आणि घरातून हाकलून दिले. आता ही घटना बिसरख पोलीस ठाण्यात पोहोचली आहे, तिथे पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर कलमांत गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न नवी दिल्ली प्रताप बाग येथील एका युवकाशी ठरले होते. नाते कौटुंबिक पातळीवर ठरले, संवाद झाला, भेटी झाल्या, त्या तरुणाने संशय येईल असे काही केले नाही. लग्न पूर्ण रीतीरिवाजांसह झाले. लग्नादरम्यान देखील पतीने विग लावली होती, त्यामुळे कोणालाही त्याच्या खऱ्या स्थितीचा अंदाज आला नाही, असा दावा पत्नीने केला.

पीडितेच्या आरोपानुसार, लग्नानंतर ज्यावेळी ती सासरी पोहोचली, त्यावेळी पत्नी पतीसोबत बेडरुमममध्ये बसली होती. त्यावेळी तिला सत्य कळाले, आपल्या जोडीदाराने तिला फसवल्याचे लक्षात आले. हे फक्त टक्कलचा नव्हते, तर जाणूनबुजून केलेली फसवणूक होती. तिने ज्यावेळी या विषयावर प्रश्न विचारले आणि नाराजी व्यक्त केली, त्यावेळी पतीने वाद सुरू केला.

यावेळी पत्नीने वाद सुरू केला. त्यावेळी शांत दिसणारा पती आक्रमक झाल्याचे पत्नीने सांगितले.  हळूहळू सासू-सासरे आणि इतर नातेवाईक देखील पतीच्या बाजूने उभे राहिले. तिला असे सांगून गप्प करण्यात येऊ लागले की आता लग्न झाले आहे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत हे नाते निभावावे लागेल. विरोध केल्यावर टोमणे, अपमान आणि धमक्या देण्यात आल्या. 

मोबाइलद्वारे दिली धमकी

या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप ब्लॅकमेलिंगबाबत लावण्यात आले आहेत. पीडितेच्या माहितीनुसार, पतीने तिच्या मोबाइल फोनवरून तिचे अनेक खाजगी फोटो काढले. नंतर याच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पैसे देण्याचा दबाव आणला. पती वारंवार म्हणत होता की जर तिने पैसे दिले नाहीत तर तिचे फोटो नातेवाईकांना आणि इंटरनेटवर टाकले जातील, असा आरोप तिने केला. या भीतीमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली.

विरोध केला तर मारहाण

ज्यावेळी तिने पैसे देण्यास नकार दिला आणि ब्लॅकमेलिंगचा विरोध केला, त्यावेळी तिच्यावर मारहाण करण्यात आली. तिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे छळण्यात आले. या उत्पीडनात पती एकटा नव्हता. सासू-सासरे आणि इतर नातेवाईक देखील यात सहभागी होते.

१५ लाखांचे दागिने हिसकावल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी सासरच्या लोकांनी तिच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांचे दागिने हिसकावून घेतले. विरोध केल्यावर तिच्यावर मारहाण करण्यात आली आणि मग तिला घरातून हाकलून देण्यात आले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती त्यावेळी पूर्णपणे असहाय्य झाली होती. मायकेकडूनही तिला नातेसंबंध जपण्याचा सल्ला दिला जात होता, परंतु परिस्थिती इतकी बिघडली होती की तिथे राहणे तिच्यासाठी शक्य नव्हते. यामुळे तिने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न