सपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल गायब

By Admin | Updated: January 24, 2017 20:08 IST2017-01-24T20:05:55+5:302017-01-24T20:08:10+5:30

उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी स्टार प्रचार म्हणून 40 जणांच्या नावाची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे. यामध्ये अखिलेश यादव यांचे काका आणि समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव

Shivpal missing from SP list of star campaigners | सपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल गायब

सपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल गायब

>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 24 - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टीतील अंतर्गत वाद-विवाद दिसून आले. त्यातच आता समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या स्टार प्रचारक यादीतून त्यांचे काका शिवपाल यादव यांचे नाव गायब झाले आहे. 
उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी स्टार प्रचार म्हणून 40 जणांच्या नावाची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे. यामध्ये अखिलेश यादव यांचे काका आणि समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते शिवपाल यादव यांचे नाव नसल्याचे दिसून येत आहे. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राम गोपाल यादव यांनी स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली. यामध्ये पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह, अखिलेश यादव, किरणमय नंदा, आझम खान, रामगोपाल यादव, जया बच्चन, राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश आहे.  
दरम्यान, गेल्या रविवारी अखिलेश यादव यांनी आपल्या समाजवादी पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून आजपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. 
 

Web Title: Shivpal missing from SP list of star campaigners