शिवाजी सिंगल बातम्या़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

प्रशासकीय इमारती परिसरात रस्ते कामे सुरू

Shivaji Single News | शिवाजी सिंगल बातम्या़़़

शिवाजी सिंगल बातम्या़़़

रशासकीय इमारती परिसरात रस्ते कामे सुरू
सोलापूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारत परिसरात बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे़ प्रशासकीय इमारतीला रंग देणे, रस्ते करणे आदी कामे सुरू झाल्यामुळे तसेच स्वच्छता मोहिीम झाल्यामुळे हा परिसर चांगला दिसू लागला आहे़
आठ टँकरने पाणीपुरवठा सुरू
सोलापूर: जिल्‘ात टंचाई परिस्थिती निर्माण झाली असली तरीही अद्याप टँकर संख्या वाढली नाही़ आठ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे़ टँकरची मागणी होत असली तरी अद्याप प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाले नाहीत, अशी माहिती महसूल विभागाने दिली़
अधीक्षकपदी नागणसुरे यांची निवड
सोलापूर: जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक स्वाती हवेली यांची बदली झाल्यामुळे त्यांचे पद गटशिक्षणाधिकारी एस़ व्ही़ नागणसुरे यांच्याकडे देण्यात आले आहे़ अद्याप माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त असून त्याचा पदभार चंदनशिवे यांच्याकडे देण्यात आला आहे़
दुभाजकामध्ये लागली झाडे
सोलापूर: भैय्या चौक ते नवीवेस पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्यामधील दुभाजकामध्ये झाडे लावण्यात आली आहेत़ त्याप्रमाणे विजापूर रोडवरील पत्रकार भवन ते केंद्रीय रेल्वे स्कूलमधील दुभाजकामध्ये देखील झाडे लावल्यामुळे रस्त्याची शोभा वाढली आहे़

Web Title: Shivaji Single News