शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीची शहरात जय्यत तयारी

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

शहर भगवेमय : मिरवणुकीत ११ चित्ररथांचा सहभाग

शहर भगवेमय : मिरवणुकीत ११ चित्ररथांचा सहभाग
नाशिक : शहर परिसरामध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली असून, सर्वत्र भगवेमय वातावरण झाले आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील चौकाचौकांमध्ये विविध पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या वतीने आकर्षक व्यासपीठ, विद्युत रोषणाई व भगवे झेंडे लावून सजावट करण्यात आली आहे. शहरातील मेनरोड, पंचवटी कारंजा या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़
शहरातील चौकाचौकांमध्ये विविध तरुण मंडळांच्या वतीने शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे़ ठिकठिकाणी छोटे मंडप, स्टेज उभे करण्यात आले असून, विविधरंगी फुले, विद्युत रोषणाईने ते सजविण्यात आले आहेत़ मेनरोड, पंचवटी परिसरातील मुख्य हमरस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शनिवारी सायंकाळनंतर परिसर उजाळून गेला होता़
शिवजयंतीनिमित्त दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने, घर, सोसायटी, व्यावसायिक संकुल आदि ठिकाणी भगवे ध्वज लावल्याने सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात येणार्‍या प्रमुख मिरवणुकीत ११ चित्ररथ सहभागी होणार असून शिवजयंती उत्साहात व शांततेत साजरी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

--इन्फो--
मिरवणूकीचा मार्ग
उद्या (दि. ८) तिथीनुसार साजर्‍या होत असलेल्या शिवजयंतीची मिरवणूक शहरातील वाकडी बारव ते पंचवटी या पारंपरिक मार्गानेच होणार आहे़ यासाठी पोलिसांच्या वतीने मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या असून, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे़ वाकडी बारव, हमीद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, गावकरी प्रेस, रेडक्रॉस, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक असा मिरवणुकीचा मार्ग असून, या मार्गावरील वाहतूक दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे़

--इन्फो--
मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात
शहरातून निघणार्‍या शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पाच पोलीस निरीक्षक, तीन सहायक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, १२० पोलीस कर्मचारी, ६० महिला पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, स्ट्रायकिंग फोर्स तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत़

फोटो :- ०७ पीएचएमआर ९४ किंवा ९७
आज (दि. ८) तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शिवजयंतीसाठी मेनरोड येथे उभारण्यात आलेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा.

फोटो :- ०७ पीएचएमआर ९२
शिवजयंतीची बाजारात विक्रीसाठी आलेल्या महाराजांच्या विविध प्रतिमा़