शिवशक्ती बँकेच्या अध्यक्षपदी बुरगुटे; उपाध्यक्षपदी जगदाळे

By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30

शिवशक्ती बँकेच्या अध्यक्षपदी बुरगुटे; उपाध्यक्षपदी जगदाळे

Shiv Sakhipi Bank's President, Buragute; Jagdal becomes the Deputy Chairman | शिवशक्ती बँकेच्या अध्यक्षपदी बुरगुटे; उपाध्यक्षपदी जगदाळे

शिवशक्ती बँकेच्या अध्यक्षपदी बुरगुटे; उपाध्यक्षपदी जगदाळे

वशक्ती बँकेच्या अध्यक्षपदी बुरगुटे; उपाध्यक्षपदी जगदाळे

बार्शी : बार्शी येथील शिवशक्ती अर्बन को.ऑप.बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक उमेश पवार यांनी नूतन संचालक मंडळाची बैठक बोलावून त्यात अध्यक्षपदासाठी डॉ.प्रकाश बुरगुटे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी अशोक जगदाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
या निवडीसाठी बँकेच्या कार्यालयात संचालकांची बैठक उमेश पवार यांनी बोलावली होती. यावेळी बँकेचे पालकत्व स्वीकारलेले डॉ.बी.वाय. यादव तसेच नगरसेवक अरुण बारबोले, व.न. इंगळे, डी.बी.पाटील, व्यवस्थापक भारत उमाटे आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन संचालक गिरीष केसकर, हनुमंत चव्हाण, धोंडिराम करंजकर, राजेंद्र मोरे, मुरलीधर चव्हाण, अरुण देबडवार, अशोक वाघमारे, व्ही. तिरुपती, गोविंद ढाळे, आप्पा लोखंडे, दिलीप बारंगुळे, डॉ. मीरा यादव, सुनीता मगर हे उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष म्हणून डॉ.प्रकाश बुरगुटे यांची तिसर्‍यांदा तर अशोक जगदाळे यांची उपाध्यक्षपदी दुसर्‍यांदा बिनविरोध निवड झाली असून बिनविरोध निवड जाहीर होताच या दोघांचा सत्कार निवडणूक अधिकारी उमेश पवार व डॉ. बी.वाय यादव यांनी शाल, श्रीफळ व फेटा बांधून केला.

Web Title: Shiv Sakhipi Bank's President, Buragute; Jagdal becomes the Deputy Chairman