अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न -बोधले महाराज

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:32+5:302015-08-31T21:30:32+5:30

बोधवाणी

Shatrughna-Bodhole Maharaj is the destroyer of arrogant enemies | अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न -बोधले महाराज

अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न -बोधले महाराज

धवाणी
बार्शी : रामायणाचा विचार केला असता राम, लक्ष्मण व भरत या पात्रांचा सातत्याने उल्लेख होतो. मात्र पडद्याआड असलेला व अहंकाररूपी शत्रूचा नाश करणारा असा शत्रुघ्न रामाचा दास, आज्ञाधारक तसेच कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा वा कोणतीही अपेक्षा नसणारा असा तो शत्रुघ्न होता, असे प्रतिपादन ह़भ़प़ अँड़ जयवंत बोधले महाराज यांनी केल़े
ते र्शी भगवंत मंदिरात र्शावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘अध्यात्म रामायण’ या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले, रामायणामध्ये चार बंधूंपैकी शत्रुघ्नचा फारसा विचार झाला नाही़ ज्यावेळी राम- लक्ष्मण चौदा वर्षे वनवासात होते त्यावेळेस भरत हादेखील चौदा वर्षे अयोध्येशेजारील नंदीग्राममध्ये होता़ अशा प्रसंगामध्ये 14 वर्षे अयोध्येचे राज्य ज्यांनी सांभाळले असा तो शत्रुघ्न होता़ वनवासाला गेलेल्या राम-लक्ष्मणाला राज्यगादीची अपेक्षा नव्हती़ त्याचप्रमाणे नंदीग्राममध्ये राहणार्‍या भरताला देखील नव्हती़ परंतु राज्यगादी समोर दिसत असताना त्याची अपेक्षा नसलेला शत्रुघ्न होता, असे महाराजांनी स्पष्ट केल़े या शत्रुघ्नचे विविध पैलू उघडून दाखवताना महाराज म्हणतात की, शत्रुघ्नने जो अहंकार जिंकला होता तसेच स्वत:चे मी पण त्याने कधीही रामायणात मिरवले नाही़ म्हणून शत्रुघ्नचा विचार हा रामाच्या दासाचा दास म्हणजे राम-भरत-शत्रुघ्न असा होतो़ नावातच शत्रुघ्न असलेला तो आज्ञाधारक होता़ रामायणामध्ये या शत्रुघ्नने लवनासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता़ तो नाश करताना प्रभू रामाला ब्र?ादेवाने दिलेला एक बाण रामाने शत्रुघ्नला दिला होता़ असा हा शत्रुघ्न रामायणात जास्त कोठे दिसत नाही़ परंतु त्याचा सर्व कार्यात सहभाग होता़ ज्या वेळेस शत्रुघ्न आणि भरत अयोध्येत आले होते तेव्हा त्यांना राम-लक्ष्मण वनवासाला गेल्याची बातमी कळाली आणि भरत कैकयीला नावे ठेवू लागला. परंतु शत्रुघ्न हा कैकयीच्या मनात हा विकार कोणी निर्माण केला, त्याचा शोध घेऊन दासी मंथराला शिक्षा देण्यास तयार झाला म्हणजेच त्याचा स्वभाव कोणत्याही गोष्टीचे मूळ शोधणारा असा तो शत्रुघ्न होता़

Web Title: Shatrughna-Bodhole Maharaj is the destroyer of arrogant enemies