शारदा घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकू

By Admin | Updated: September 8, 2014 02:24 IST2014-09-08T02:24:22+5:302014-09-08T02:24:22+5:30

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारीच शारदा चिट फंड घोटाळ्यात सामील आहेत आणि जे दोषी आहेत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी भाजपा पाऊल उचलेल,

Shares convicts in the Saradha scam | शारदा घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकू

शारदा घोटाळ्यातील दोषींना तुरुंगात टाकू

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सहकारीच शारदा चिट फंड घोटाळ्यात सामील आहेत आणि जे दोषी आहेत त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी भाजपा पाऊल उचलेल, असे जाहीर करीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते.
शारदा चिट फंड घोटाळ्यात १७ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पण तुम्ही (बॅनर्जी) त्याविरुद्ध आवाज उठविला नाही वा कधी रस्त्यावर आला नाहीत. कारण तुमचेच सहकारी त्यात गुंतले आहेत. शारदा घोटाळ्यातील हा पैसा कुठे गेला याचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे शहा म्हणाले. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये २० हजारावर शेतकऱ्यांना जमिनी गमवाव्या लागल्या. त्या अन्यायाविरुद्ध तुम्ही उपोषण केले होते. मात्र शारदा घोटाळ्याविरुद्ध उपोषणाला बसावे असे तुम्हाला (बॅनर्जी) का वाटले नाही? (वृत्तसंस्था)

Web Title: Shares convicts in the Saradha scam