शारदा घोटाळा : सेनविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल

By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:37+5:302014-12-27T23:38:37+5:30

नवी दिल्ली : शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन याच्याविरुद्ध सीबीआयने आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले आहेत. कंपनीने आसाममधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या संदर्भात हे नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sharda scam: Two more cases against Sen filed | शारदा घोटाळा : सेनविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल

शारदा घोटाळा : सेनविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल

ी दिल्ली : शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन याच्याविरुद्ध सीबीआयने आणखी दोन नवे गुन्हे दाखल केले आहेत. कंपनीने आसाममधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या संदर्भात हे नवे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संयुक्त संचालक राजीव सिंग यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या विशेष तपास पथकाने फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघात केल्याच्या संदर्भात गुन्हे दााखल केले आहेत. शारदा आणि तिच्या संलग्न कंपन्यांद्वारा बचतीवर आकर्षक व्याजाचा प्रस्ताव देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा रेफरन्स आसाम सरकारकडून मिळाला असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.
या नव्या गुन्ह्यांमुळे आता शारदा व संलग्न कंपन्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे. या गुन्ह्यांतर्गत सेन याच्यासह कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच तृणमूल काँग्रेसचे खासदार कुणाल घोष, संजय बोस आणि पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्रा यांना आरोपी बनविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sharda scam: Two more cases against Sen filed