शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

Shaheen Bagh Protest: आंदोलनस्थळी पेट्रोल बॉम्ब फेकला, निदर्शकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:10 PM

जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी फक्त 4-5 महिला शाहीन बागमध्ये निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या.

नवी दिल्लीः जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शाहीन बाग भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ आंदोलक विरोध प्रदर्शन करत आहेत. विरोध प्रदर्शन करत असलेल्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी घटनास्थळाजवळ पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बॅरिकेड्सजवळील सापडलेल्या प्लास्टिकच्या बाटलमधून काही स्फोटक सामान जप्त करण्यात आलं आहे. विशेष पोलीस आयुक्तांनी ही कोणतीही मोठी घटना नसल्याचं म्हटलं आहे. जनता कर्फ्यूच्या दिवशी रविवारी फक्त 4-5 महिला शाहीन बागमध्ये निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनाला बसल्या होत्या.जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांनी असा दावा केला आहे की, गेट क्रमांक 7वर असलेल्या निदर्शन स्थळावर काही लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आहे. घटनास्थळी काचेचे तुकडेही सापडले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकू आला असून, धूरही दिसला. दुचाकीवरून दोन जण आले होते. मात्र जामिया निषेधस्थळी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  विरोधकांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय 23 मार्चला सुनावणी करणारकोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा विषय ऐकण्यास सहमती दर्शविली आहे. सर्वोच्च न्यायालय 23 मार्च रोजी यावर सुनावणी करणार आहे.