शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात खेळाडूंची उडी; अर्जुन आणि पद्म पुरस्कार परत देण्याचा इशारा

By मोरेश्वर येरम | Updated: December 2, 2020 11:20 IST

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देमाजी खेळाडूंनी दिला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबायेत्या ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनासमोर पुरस्कार ठेवून खेळाडू व्यक्त करणार निषेधशेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे, लाठीचार्जचा व्यक्त केला निषेध

दिल्लीनव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता माजी खेळाडूंचाही पाठिंबा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार परत देण्याची घोषणा माजी खेळाडूंनी केली आहे. शेतकऱ्यांना जर अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करायचं? शेतकऱ्यांच्या विरोधात बळाचा वापर करणं कोणत्याही अर्थाने योग्य नसून याचा आम्ही विरोध करतो, असं या खेळाडूंनी म्हटलं आहे. खेळाडूंच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात मंगळवारी चर्चा झाली. पाच सदस्यांची समिती नेमून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे सरकारने विज्ञान भवनात बोलावलेल्या बैठकीची तिसरी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. आज सलग सातव्या दिवशी दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जोवर कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर आंदोलन सुरुच राहणार असल्याची ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. 

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेल्या माजी खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते बास्केटबॉलपटू साजन सिंग चीमा आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबिर कौर यांचा समावेश आहे. या खेळाडूंसह आणखी काही खेळाडूंनी सरकारला ५ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत तर येत्या ५ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपती भवनासमोर आपल्याला मिळालेले पुरस्कार ठेवून ते परत देण्याचा इशारा या खेळाडूंनी दिला आहे. 

शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर केल्याच्या मुद्द्यावर माजी खेळाडूंनी केंद व हरियाणा सरकारवर संताप व्यक्त केला. ''आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते अतिशय शांत पद्धतीने आपला निषेध व्यक्त करत आहेत. हिंसा झाल्याची एकही घटना समोर आली नाही. पण ते दिल्लीकडे जात असताना त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले गेले, अश्रूधुराचा वापर करण्यात आला हे अतिशय निंदनीय आहे. जर आपल्या वडीलधारी व्यक्तींना अशी वागणूक मिळणार असेल तर आमचे पुरस्कार काय कामाचे? त्यामुळे हे पुरस्कार आम्ही परत करण्याचा निर्णय घेतला आहे", असं साजन सिंग चीमा म्हणाले. साजन सिंग हे पंजाब पोलीस दलात पोलीस अधिकारी देखील राहीले आहेत. 

शेतकऱ्यांना जर हे नवे कायदे नको असतील तर मग केंद्र सरकार ते लादण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल देखील साजन सिंग यांनी यावेळी उपस्थित केला. याशिवाय हरियाणातील माजी खेळाडूंनाही या आंदोलनात सामील करुन घेण्यासाठी संपर्क साधत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीHaryanaहरयाणाPunjabपंजाब